Ms Dhoni Drives Sports Car Video Viral : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला वेगवेगळ्या गाड्या चालवायला खूप आवडतं, हे आपल्या सर्वांना माहितच आहे. याच कारणामुळे धोनीच्या घराजवळ गाड्यांची लाईनच लागलेली असते. धोनीचे स्पोर्ट्स कार किंवा बाईक ड्राईव्ह करतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक जबरदस्त व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे. रांचीच्या रस्त्यावर धोनी विंटेज कार ड्राईव्ह करत असताना कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. तसंच एका एअर होस्टेसने धोनीचा विमानात बसलेला व्हिडीओही इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला आहे.
धोनीचा हा सुंदर व्हिडीओ @CricCrazyjohns नावाच्या यूजरने ट्वीटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच धोनीच्या चाहत्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १८ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, एम एस धोनी रांचीच्या रस्त्यावर ड्राईव्ह करताना. धोनीच्या या नवीन व्हिडीओनंही लोकांचं लक्ष पुन्हा एकदा वेधून घेतलं आहे.
नक्की वाचा – Optical Illusion: फोटोत ससा दिसतोय का? पण तो ससा नाही, एकदा क्लिक करून नीट पाहा
इथे पाहा व्हिडीओ
याआधी धोनी रोल्स रॉयस रैथ ड्राईव्ह करताना कॅमेराबद्ध झाला होता. ही कार लग्जरी सेडान कार म्हणून ओळखली जाते. या कारचं मॉडेल १९७५ ते १९८० मध्ये चर्चेत होतं, असं बोललं जात आहे. २७ सेकंदाच्या या व्हिडीओत पाहू शकता की, धोनी १९७३ ती विंटेज कार कपोंटिएक ट्रांस एम एसडी-४५५ चालवत आहे. ही लाल रंगाची कार चालवत असताना कॅप्टन कूल धोनीने काळ्या रंगाचा चष्मा घातला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने म्हटलं, या कारच्या प्रेमात पडलो. तर अन्य एक यूजर म्हणाला, कलेक्शन असावं तर असं. कार आणि ट्रॉफिचं सर्वात चांगलं कनेक्शन धोनीकडे आहे, असंही एका यूजरने म्हटलं.