Ambani Family Jewellery Collection : मुकेश आणि नीता अंबानी यांचे कुटुंब भारतातील सर्वात श्रीमंत घराण्यांपैकी एक आहेत, त्यामुळे त्यांच्या दागिन्यांपासून कपड्यांपर्यंत प्रत्येक गोष्टी चर्चेत असतात. विशेषत: नीता अंबानींसह त्यांची लेक अन् सुनांच्या दागिन्यांविषयी बरीच चर्चा रंगताना दिसते. यात गेल्या काही वर्षांत अंबानी कुटुंबीयांनी उत्कृष्ट आणि ऐतिहासिक दागिन्यांचे एक अद्भुत कलेक्शन तयार केले आहे, ज्यात मुघलकालीन दागिन्यांपासून मौल्यवान हार, अंगठ्यांसह अनेक दागिन्यांचा समावेश आहे. पण, मुकेश आणि नीता अंबानी यांच्यासह त्यांच्या लेक, सुना अन् मुलांकडे नेमके कोणते आणि किती किमतींचे दागिने आहेत जाणून घेऊ….

नीता अंबानीकडे आहे २०० कोटी रुपयांचे मुलघकालीन बाजूबंद

नीता अंबानी यांच्याकडे एक अतिशय खास बाजूबंद आहे, जो त्यांनी २०२४ च्या मिस वर्ल्डच्या अंतिम फेरीत घातला होता. हा बाजूबंद मुघल सम्राट शाहजहान यांच्या घराण्यातील आहे, त्यामुळे त्याच्या डिझाइनमध्ये शाही कारागिरी दिसून येते. सोन्यापासून बनवलेल्या या बाजूबंदात डायमंड, रुबी आणि स्पिनल्स बसवण्यात आले आहेत, ज्याची किंमत तब्बल २०० कोटी रुपये आहे.

श्लोका मेहताचा लग्नातील ४५१ कोटी रुपयांचा हार

आकाश अंबानींशी लग्न केलं तेव्हा श्लोका मेहता यांनी मौवाद एल’इनकॉम्परेबल नेकलेस घातला होता, ज्यामध्ये ४०७.४८ कॅरेटचा पुष्कराज रंगाचा हिरा आहे. हा सुंदर नेकलेस आतापर्यंत बनवलेल्या सर्वात मौल्यवान नेकलेसपैकी एक आहे, त्याची किंमत ४५१ कोटी रुपये आहे.

ईशा अंबानींकडे आहे १६७ कोटी रुपयांचा हिऱ्यांचा हार

सुंदर फॅशन सेन्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या ईशा अंबानींकडे १६७ कोटी रुपये किमतीचा सुंदर हिऱ्यांचा हार आहे, ज्यात आकर्षक आणि न कटिंग केलेल्या हिऱ्यांचा वापर करण्यात आला आहे, त्यामुळे त्यांचा सिंपल दिसणारा पण मौल्यवान हार सर्वांना आकर्षित करतो.

नीता अंबानींकडे ५०० कोटींचा पन्ना हिऱ्यांचा हार अन् ५३ कोटींची हिऱ्याची अंगठी

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नापूर्वी पार पडलेल्या कार्यक्रमात नीता अंबानींच्या हाराने सर्वांचे लक्ष वेधले होते. नीता अंबानी यांनी यावेळी मौल्यवान पन्ना आणि हिऱ्याचा हार परिधान केला होता, ज्याची किंमत तब्बल ४०० कोटी ते ५०० कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचे मानले जाते, ज्यामुळे त्यांचा हा मौल्यवान हार भारतीय महिलेने परिधान केलेल्या सर्वात महागड्या हारांपैकी एक आहे.

याशिवाय नीता अंबानी यांनी ५३ कोटी रुपये किमतीची ५२.५८ कॅरेट हिऱ्याची अंगठी घातली होती, जी त्यांच्या पन्ना आणि हिऱ्यांच्या हाराशी अगदी जुळणारी होती.

अनंत अंबानींकडे ६७.५ अन् १३.२ कोटींची महागडी घड्याळं

मुकेश आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांना महागड्या घड्याळ्यांची फार क्रेझ आहे, त्यांंच्याकडे जगातील सर्वात आलिशान घड्याळांपैकी एक, ‘पाटेक फिलिप’चं ग्रँडमास्टर चाइम हे घड्याळ आहे. हे घड्याळ त्याच्या दुर्मीळ कारागिरीसाठी प्रसिद्ध आहे आणि त्याची किंमत ६७.५ कोटी रुपये आहे.

याशिवाय त्यांच्याकडे पाटेक फिलिपचं दुर्मीळ स्काय मून टूरबिलोन हे घड्याळदेखील आहे, ज्याची किंमत ५४ कोटी रुपये इतकी आहे. त्याच्या दोन्ही बाजूंना फेस डायल आहे. त्याच्या युनिक डिझाइनमुळे ते खूप महाग आहे.

अनंत अंबानी यांना त्यांच्या लग्नात भाऊ आकाश अंबानी यांनी एक खास कार्टियर ब्रोच भेट दिला होता. हा ब्रोच १८ कॅरेटचा होता. या ब्रोचमध्ये ६०६ न कापलेले हिरे, ५१ नीलमणी आणि दोन पन्ना हिऱ्यांचा वापर केला आहे, ज्याची किंमत सुमारे १३.२ कोटी रुपये आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राधिका मर्चंट यांच्याकडे आहे पर्ल-डायमंड चोकर

अनंत अंबानी यांच्या पत्नी राधिका मर्चंट यांना त्यांच्या सासू नीता अंबानी यांनी एक सुंदर मोती आणि हिऱ्यांचा चोकर दिला आहे. जरी नेमकी किंमत जाहीर केलेली नसली तरी, त्याची किंमत अनेक कोटी रुपये असल्याचे मानले जाते.