पावसाळय़ाची सुरुवात झाली, की मुंबई-गोवा महामार्गावर खड्डय़ांचा त्रास सुरू होतो. कोकणात जाताना त्याचा त्रास होतो. गेल्या आठ-दहा वर्षांत ‘रोड ट्रिप’ काढून मुंबई-गोवा हायवेनं गेला असाल, तर तुम्हाला प्रवासाच्या आनंदापेक्षा मनस्तापच झाला असण्याची शक्यता जास्त आहे. कुठे रस्त्याला खड्डे पडले आहेत, कुठे रस्त्याचं काम सुरू आहे, कुठे अरुंद मार्गावर वाहतुकीचा खोळंबा होतो आहे, अशा समस्या आता नेहमीची गोष्ट बनली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग असून एकप्रकारे तो कोकणातल्या वाहतुकीचा कणाच आहे. मंबई-गोवा महामार्गाची झालेली दुरवस्था पाहून सामान्य नागरिक संताप व्यक्त करत आहेत. अशाच एका संतापलेल्या तरुणाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. महामार्गावर पडलेल्या भल्यामोठ्या खड्ड्यात उतरून त्याने प्रशासनाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

हा महामार्ग मुंबईला कोकणासह गोवा, कर्नाटक, केरळ या राज्यांशी जोडणाऱ्या नॅशनल हायवे 66 या मार्गाचा भाग आहे. पनवेलपासून सुरू होणारा हा रस्ता गोव्याच्या पणजीमधून पुढे कन्याकुमारीपर्यंत जातो. जेएनपीटी हे भारतातलं सर्वात मोठं कंटेनरची वाहतूक करणारं बंदर आणि दिघी इथलं निर्माणाधीन आंतरराष्ट्रीय बंदर मुंबई-गोवा महामार्गानं देशाच्या इतर भागांशी, विशेषतः दक्षिणेशी जोडली जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरून व्यापारी वाहतूकही होते.

मुंबई-गोवा महामार्गाची पुरती दुरवस्था

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा तरुण प्रचंड चिडला असून खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यात तो संपूर्णपणे बुडून दाखवत आहे. या रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे, हेच याठिकाणी कळत नाहीये. हा तरुण देखील प्रशासनावर ताशेरे ओढत कुठे आहे प्रशासन अशी विचारणा करत आहे. तसेच लवकरात लवकर याकडे लक्ष द्या अशी मागणीही करत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – द ग्रेट खलीनं चक्क डायनासॉर गिळला, VIDEO पाहून लोक म्हणाले, ‘म्हणूनच डायनासॉरचा शेवट झाला’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोकणात मुंबई – गोवा महामार्गाची पुरती दुरवस्था झाली आहे. गेली अनेक वर्षे या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम रखडले आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेत. त्यातून वाहन चालवणं चालकांना जिकिरीचं होऊन बसले आहे. परिणामी वाहनांचा वेग मंदावतो आणि सातत्यानं वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. सगळीकडे धुळीचे साम्राज्य पसरले आहे. वाहतूक पोलीसही यापुढे हतबल झालेत.