Rohit Sharma Lamborghini Urus Car Features: भारताचा स्टार क्रिकेटपटू रोहित शर्मा काही दिवसांपूर्वीच कसोटी कर्णधारपद सोडल्याने चर्चेत आला होता. आता एका वेगळ्यात कारणासाठी तो चर्चेचा विषय ठरलाय. मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्माने ड्रीम इलेव्हन जिंकणाऱ्या महाराष्ट्रीयन तरुणाला चक्क लॅम्बोर्गिनी भेट म्हणून दिली आहे. खुद्द रोहित शर्माच्या हस्ते कारची चावीही विजेत्या तरुणाला देण्यात आली आहे, ज्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रोहित शर्मा या कारमधून अनेकदा मुंबईच्या रस्त्यांवर फेरफटका मारताना दिसला होता. रोहित शर्माची ही कार खूप खास होती. Lamborghini Urus कारचे जबरदस्त फीचर्स तुम्हाला माहीत आहेत का? चला तर मग जाणून घेऊ त्याविषयी…
खरं तर, रोहित शर्माला कारचे प्रचंड वेड आहे. रोहित शर्माकडे लक्झरी कार आणि बाइक्सचाही मोठा संग्रह आहे. रोहितकडे टोयोटा फॉर्च्युनर, BMW-X3, BMW M5 Nissan, Mercedes व Audi सारख्या लक्झरी कार्सचा संग्रह आहे. रोहितची ‘२६४’ क्रमांक असलेली लॅम्बोर्गिनी ही कार दीर्घकाळापासून त्याच्याकडे आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या २६४ धावांच्या विश्वविक्रमी खेळीचा आकडा त्याने या कारला नंबर म्हणून दिला आहे.
Lamborghini ही देशातील सर्वांत प्रसिद्ध कार कंपन्यांपैकी एक असून खरं तर ही कार तिच्या वेगासाठी ओळखली जाते. लॅम्बोर्गिनी बाजारात आली आणि तिच्या आकर्षक लूक व वेगामुळे अल्पावधीतच प्रसिद्ध झाली. आज लॅम्बोर्गिनी सर्वांत महाग कार म्हणून ओळखली जाते.
लॅम्बोर्गिनी उरुस एस या कारला स्पोर्टी बंपर आणि कूलिंग व्हेंट्ससह बोनेट जोडलेले आहे. एअर सस्पेंशन सिस्टीमने सुसज्ज असलेल्या या एसयूव्हीमध्ये फिक्स्ड कॉइल सेटअप आहे. ही स्पोर्ट्स कार V१० इंजिनासह येते. जे ६५० CV कमाल पॉवर आणि ८५० Nm पीक टॉर्क जनरेट करते. ही ५-सीटर SUV आहे. आणि ती ३.२ सेकंदांत ०-१०० किमी प्रतितास वेग घेऊ शकते. त्याचा टॉप स्पीड ३२५ किमी प्रतितास आहे. या एसयूव्हीमध्ये ८-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्स्मिशन उपलब्ध आहेत.
येथे पाहा व्हिडीओ
लॅम्बोर्गिनी उरुसमध्ये बसविलेल्या विशेष कार्बोसेरामिक डिस्क ब्रेकमुळे, त्याची ब्रेकिंग सिस्टीम आणखी चांगली होते. ब्रेक लावताना, ती फक्त ३३.७ मीटरमध्ये १०० ते ० पर्यंत थांबू शकते. त्याची ब्रेकिंग सिस्टीम प्रभावी आणि शक्तिशाली आहे. अॅडॉप्टिव्ह एअर सस्पेन्शन, अॅक्टिव्ह डॅम्पिंग, ४-व्हील ड्राइव्ह व ४-व्हील स्टेअरिंग यांसारखी वैशिष्ट्ये या कारमध्ये उपलब्ध आहेत. या कारची किंमत ४.५ कोटी रुपयांच्या घरात असल्याची माहिती आहे.