Mumbai local viral poster: ‘पुणेरी पाट्या’ या जगात प्रसिद्ध आहेत. कारण मोजक्या शब्दात जास्तीत जास्त माहिती या पाट्यांद्वारे दिली जाते. अशीच एक मजेशीर पाटी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. पुणे म्हटलं की अर्थात पुणेरी पाट्या लक्षात येतातच. पुणेरी पाट्या या अनेकदा चर्चेचा विषय बनतात. कधी वाद तयार करतात तर कधी वादावर भाष्य करतात. कधी चांगला संदेश देतात तर कधी चांगलाच संदेश पोहोचवतात. दरम्यान आता यात मुंबईकरही मागे राहिलेले नाहीयेत. सध्या मुंबई लोकलमध्ये लावलेल्या पाटीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. ही पाटी वाचून प्रत्येक मुंबईकर प्रवासी पोट धरुन हसेल एवढं नक्की.
“ट्रेन पकडणं म्हणजे लग्नासारखं आहे कारण…”
मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन कायमच खचाखच भरलेली असते. मुंबईच्या उपनगरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रवासासाठी लोकल ट्रेन सर्वात कमी खर्चिक पर्याय आहे. त्यामुळे शेकडो नागरिक ट्रेननेच प्रवास करतात.मुंबईमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी येणाऱ्या लोकांमुळे ही गर्दी वाढत आहे. या मुंबई लोकलची गर्दी हीच तिची खरी ओळख आहे असं म्हणायला हरकत नाही. याच गर्दीच्या विषयाला धरुन ही पाटी लिहली आहे. आता तुम्ही म्हणाल असं लिहलंय तरी काय? तर या पाटीवर “ट्रेन पकडणं म्हणजे लग्नासारखं आहे वेळ चुकली तर सगळं हातातून गेलं” असं लिहलं आहे.
मुंबईकरांची लाईफलाईन समजली जाणारी लोकल सर्वसामान्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहे. लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. सकाळी कामावर जाताना रोजची ट्रेन चुकली तर ऑफिसात जायला उशीर होणार या भीतीने मुंबईकर लोलकच्या मागे जीव मुठीत धरुन धावतो आणि लोलकमध्ये चढतो. काही मंडळी अक्षरश: पूर्ण ताकत एकवटून डब्यात शिरण्याचा प्रयत्न करतात. काही जणं तर फुटबोर्डवर एक पाय ठेवून पूर्ण प्रवास करतात.
पाहा फोटो

सोशल मीडियावर हा फोटो lalbaug_parel नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
