Mumbai Local Women Sexual Assault: काही दिवसांपूर्वी मुंबईत एका ४० वर्षीय व्यक्तीने लोकल ट्रेनमध्ये २० वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली होती. नवाझु करीम नामक इसमाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते मस्जिद (Masjid) स्थानकांदरम्यान मुंबई लोकलच्या महिलांच्या डब्यात शिरून तरुणीचा विनयभंग केला होता. यानंतर या इसमाला अटक करण्यात आली होती मात्र आता याच आरोपीचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांकडून रेल्वे प्रशासनावर ताशेरे ओढले जात आहेत. CCTV मध्ये सर्व प्रकार समोर असतानाही त्याच वेळी कारवाई का केली नाही असेही प्रश्न केले होते. नेमकं असं या व्हिडीओमध्ये काय आहे, पाहूया…

सीसीटीव्हीत आरोपी नवाजू करीम शेख स्टेशनवर फिरताना दिसत आहे. यावेळी तो तेथील महिलांना जाणुनबुजून छेडत होता हे कॅमेऱ्यात स्पष्ट दिसत आहे. बलात्कार केला त्याच दिवशी सकाळी त्याने स्थानकावर एकूण ५ महिलांची छेड काढली होती. याबाबतचे काही व्हिडीओ ट्विटर युजर शेअर इतकंच नाही तर त्याने गर्दी नसतानाही वाट बदलून एका महिलेला धक्का दिल्याचं दिसत आहे. दुर्दैवाने यातील एकाही महिलेने पोलिसांकडे तक्रार केली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Video: मुंबई लोकलमध्ये तरुणीचा बलात्कार करणाऱ्या नवाझुने…

दरम्यान, नवाझुने महिलांच्या डब्यातील तरुणीवर अत्याचार करण्याचा प्रकार केला तेव्हा सदर तरुणीने रेल्वे सुरक्षा दलाकडे (आरपीएफ) तक्रार दाखल केली. रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आरपीएफ आणि मुंबई पोलिसांच्या शोधपथकाने मस्जिद स्थानकातील सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला ओळखून त्याच रात्री आरोपीला अटक केली होती.