Mumbai Local Viral Video: मागील दोन दिवसात मुंबई लोकलवर पावसाचा परिणाम झाल्याने अनेक प्रवाशांची अक्षरशः दैना झाली होती. बंद पडलेल्या लोकलमधून उतरून रूळातून चालत घराकडे जाण्यासाठी निघालेल्या एका आईने आपल्या चार महिन्यांच्या बाळाला गमावल्याचे प्रकरणही ताजे आहे. लहान मुलांना घेऊन अशा परिस्थितीत ट्रेनमधून प्रवास का करायचा असे प्रश्नही काहीजण करत आहेत. अनेकदा हीच तक्रार गर्दीच्या वेळी सुद्धा लोकांकडून केली जाते. काही स्त्रिया आपल्या अगदी इवल्याश्या जीवाला घेऊन गर्दीत लोकल पकडायचं धाडस करतात, कधी बसायला जागा नसल्याने, कधी प्रचंड उकडत असल्याने या बाळांची अवस्था अगदी वाईट होते आणि ते रडून पूर्ण डबा डोक्यावर घेतात. काहीवेळा हे असे स्टंट विनाकारण असले तरी अनेकदा ही परिस्थितीची गरजच असते, त्यामुळेच कदाचित या महिला आपल्या चिमुकल्याला घेऊन ट्रेन पकडत असतील. अशाच एक महिलेचा एक व्हिडीओ चांगल्या कारणाने सध्या चर्चेत आहे.

मुंबई लोकलमध्ये जुगाडू डोक्याची कमी नाही असे म्हणतात तसाच काहीसा हटके जुगाड या महिलेने सुद्धा केला आहे. आपल्या बाळाला गरम होऊन तो रडू नये म्हणून ही महिला चक्क लोकलमध्ये फॅन घेऊन आली आहे. तिचा हा जुगाड इतर महिलांनाही खूप आवडल्याने त्याही सर्व तिच्याकडे कुतूहलाने पाहत आहेत. कॅप्शनमध्ये सुद्धा “ती मराठी आई आहे, ती डोकं लावणारच” असं लिहून या महिलेचं कौतुक केलेलं पाहायला मिळतंय.

Video: मुंबई लोकलमध्ये आईचा जुगाड

हे ही वाचा<< नाल्यात वाहून गेलेले चार महिन्यांचे बाळ जिवंत सापडले? २४ तासांनी अखेरीस समोर येतेय ‘ही’ माहिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, असाच काहीसा प्रकार याआधीही लोकल ट्रेनमधून व्हायरल झाला होता. एका महिलेने आपल्या बाळाला बसायला जागा नाही म्हणून चक्क बॅग ठेवण्यासाठी लावलेल्या स्टीलच्या रॅकवर आपल्या बाळाला बसवले होते. आता व्हायरल झालेला व्हिडीओ सुद्धा चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडिओवर आतपर्यंत ७ हजाराहून अधिक लाईक्स व हजारो व्ह्यूज आहेत. तुम्हाला हा जुगाड कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा.