Viral Video Brother’s Childhood Lost in Responsibility of His Sister : जबाबदारी म्हणजे आपण स्वत:हून स्वीकारलेली एक भूमिका. अभ्यास-नोकरी एकत्र करणे, आवड बाजूला ठेवून नावडती नोकरी सुद्धा हसत-हसत करावी लागते. जबाबदारी पूर्ण करताना समोर असलेल्या कामावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करावा लागतो. त्यामुळे जबाबदारी काय असते हे कदाचित वयाने लहान पण खांद्यांवर मोठी जबाबदारी घेऊन फिरणाऱ्या एका लेकरालाच विचारा. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये असेच काहीसे दृश्य ट्रेनमध्ये पाहायला मिळाले आहे.
व्हायरल व्हिडीओ मुंबई लोकलमधील आहे. मुंबई लोकलकच्या दरवाजापाशी दोन भावंडे बसली आहेत. मोठा भाऊ आपल्या मांडीवर लहान बहिणीला घेऊन बसला आहे. स्वतःचे वय कमी असतानाही त्याने आपल्या चिमुकल्या बहिणीला सुखरूप घेऊन जाण्याची, त्याचा सांभाळ करण्याची आणि लाड करण्याची जबाबदारी घेतलेली दिसत आहे. मजा-मस्ती करण्याच्या वयात त्याने छोट्या भावाची जबाबदारी घेतली आहे; जे पाहून ट्रेनमधल्या प्रवाशाने या क्षणाचा व्हिडीओ शूट करून घेतला आहे.
बहिणीच्या जबाबदारीमुळे बालपण गमावलं (Viral Video)
सगळ्या नात्यांमध्ये अगदी वेगळे नाते कोणाचे असले तर भावा-बहिणीचे असते. एकमेकांशी भांड भांड भांडतील पण बहिणीला कोणी ओरडल्यावर भावाच्या डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही. व्हायरल व्हिडीओतही तुम्ही पाहिले असेल की, बहिणीची काळजी घेण्यासाठी भाऊ त्याचे लहानपण विसरून गेला आहे आणि इवल्याश्या खांद्यावर त्याने तिची जबाबदारी घेतली आहे आणि तिचा सांभाळ करताना दिसला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @samaacoreee या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “इवल्याश्या खांद्यावर भलीमोठी जबाबदारी” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून “बिचाऱ्या मोठ्या भावाला स्वतःचे लहानपण गमावून मोठे होण्याची जबाबदारी घ्यावी लागते आहे. त्याला पुन्हा कधी स्वतःचे बालपण जगण्याची संधी मिळेल का”, “प्रत्येक मुलीचा दुसरा बाबा म्हणजे त्याचा मोठा भाऊ”, “बहिणीच्या जबाबदारीमुळे स्वतःचे बालपण गमावलं; एका पुरूषाला कुटुंबाची जबाबदारी घ्यायला आवडते” ; आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.