Mumbai Local Woman Fight Video : मुंबई लोकलनं रोजचा प्रवास करणं काही सोपं काम नाही. गर्दी, धक्काबुक्की, वाद अशा अनेक गोष्टींचा सामना रोजच्या प्रवासादरम्यान करावा लागतो. याच मुंबई लोकलनं प्रवास करताना चांगले-वाईट प्रसंग घडत असतात. पण, अनेकदा सोशल मीडियावर मुंबई लोकलमधील भांडणं, मारामारीचे विषय चर्चेत असतात. सध्या मुंबई लोकलमधील असाच एका भांडणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात दोन महिला एकमेकींशी वाद घालताना दिसत आहेत.

मुंबई लोकलमधून प्रवास करताना अनेकदा काही महिला अगदी क्षुल्लक कारणावरूनही भांडण करताना दिसतात. या व्हिडीओतही दोन महिला अगदी एका लहानशा कारणावरून एकमेकींवर खेचताना दिसतायत.

केस का उडवतेस?” दोन महिलांमध्ये वाद

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, लोकल ट्रेनमध्ये प्रवास करताना दोन महिला एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. काही वेळातच भांडण इतकं वाढलं की, एका महिलेनं दुसऱ्या महिलेला जोरदार फटकारले. दोघांमध्ये केसांवरून भांडण झालं. व्हिडिओमध्ये दिसतेय की, एक महिला तिचे केस मागे झटकताना दिसते. त्यामुळे तिच्या मागे उभ्या असलेल्या महिलेच्या तोंडावर तिचे केस उडतात, यावरून ती संतापते आणि तिचे केस पकडून पुढे करते. त्यावरून दोघींमध्ये वाद होतो. दुसरी महिला त्या पहिल्या महिलेस विचारते की, केस का उडवतेस? त्यावर ती पहिली महिला, माझे केस मी कायपण करेन, असं उलट उत्तर देते. मग पुढे दोघींमधील वाद वाढत जातो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकल ट्रेनमधील महिलांच्या भांडणाचा हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. दरम्यान, या व्हिडीओवर आता युजर्सही वेगवेगळ्या भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. एकानं लिहिलं की, लोकल ट्रेनचा प्रवास असंच भांडण बघता बघता संपतो. दुसऱ्यानं लिहिलं की, या काकी लोकांना सगळ्याच गोष्टींचा त्रास असतो. तिसऱ्यानं लिहिलं की, महिलांची भांडणं काही थांबत नसतात.