मुंबईमध्ये अगदी काही दिवसांपूर्वीच अटल सेतू या ट्रान्स हार्बर लिंकचे उदघाटन झाले आहे. त्यानंतर बरेच प्रवासी या पुलावर गाड्या बाजूला लावून फोटो काढत असल्याचे, व्हिडीओ बनवत असल्याचे दृश्य आपल्याला अनेक सोशल मीडियाव माध्यमांवरून पाहायला मिळाले आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी या पुलाला, एखाद्या सहलीच्या ठिकाणासारखे बनवले होते. अगदी एक-दोन दिवसांमध्येच नागरिकांच्या अशा वागण्यामुळे, या पुलावर कचरा आणि पान-गुटखा खाऊन थुंकल्याच्या खुणा पाहायला मिळाल्या आहे.

खरंतर या सेतूवर एक ठराविक वेगमर्यादा आखून दिली असून, केवळ निवडक वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये दुचाकी, रिक्षा इत्यादी वाहनांचा समावेश करण्यात आलेला नाहीये. असे असले तरीही एक्स [पूर्वीचे ट्विटर] या सोशल मीडियावर सध्या एक फोटो नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. कारण- अटल सेतूवर चक्क तीन चाकी म्हणजे, रिक्षा धावत आल्याचा तो फोटो आहे.

हेही वाचा : पदार्थांवर माश्या बसल्यावर नेमके काय घडते? हे वाचा, रस्त्यावरचे अन्नपदार्थ खाण्याआधी १० वेळा विचार कराल…

@Saravanan_rd या अकाउंटवरून हा फोटो पोस्ट करण्यात आलेला आहे. या सेतूचे उद्घाटन केल्यानंतर या सेतूवर बैलगाडी, धीम्या गतीची कोणतीही वाहने, तीन चाकी आणि दुचाकी यांना परवानगी नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. तरीही ही रिक्षा इथे कशी काय पोहोचली? असा अनेकांना प्रश्न पडला. इतकेच नव्हे तर, नेटकऱ्यांनी मुंबई पोलिसांनी यावर कारवाई करावी यासाठी त्यांच्या अधिकृत अकाउंटला टॅग करून तो फोटो त्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे.

व्हायरल होणाऱ्या या फोटोवर नेटकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत पाहा.

“हे कसं शक्य आहे? मुळात या पुलावर येताना दोन्ही बाजूंनी टोलनाके लागतात. आणि तसेही दक्षिण मुंबईमध्ये रिक्षा नसतातच मग तरीही हा चालक इथे आलाच कसा?” असा एकाला प्रश्न पडला आहे. “तरी नशीब फोटो काढण्यासाठी त्याने रिक्षा थांबवली नाही.” असे दुसऱ्याने लिहिले. शेवटी तिसऱ्याने “@MTPHereToHelp @Navimumpolice कृपया अटल सेतूवर फिरणाऱ्या या रिक्षा चालकाला दंड करावा.” अशी मुंबई पोलिसांकडे विनंती केली आहे.

हेही वाचा : “चहा आहे की बटर घातलेला हलवा?” पाहा, व्हायरल होणाऱ्या ‘या’ चहावर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया…

प्रवाशांनी या पुलावर बाजूला थांबून केलेली गर्दी पाहून, “नवीन उदघाटन झालेला हा अटल सेतू खरंच खूप सुंदर आहे हे आम्हाला मान्य आहे. परंतु तरीही, या पुलावर थांबणे, फोटो काढणे हे बेकायदेशीर आहे. असे केल्यास त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.” अशी चेतावणी मुंबई पोलिसांनी दिलेली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

@Saravanan_rd या अकाउंटने शेअर केलेल्या फोटोला आत्तापर्यंत १८८.७K इतके व्ह्यूज मिळालेले आहेत.