Facebook चं नवं नाव #Meta ट्रेंडवर मुंबई पोलिसांकडून हटके अंदाजात मीम शेअर

फेसबुकच्या रि-ब्रॅंडनंतर सोशल मीडिया यूजर्सनी मात्र वेगवेगळ्या मीम्सचा अक्षरशः पाऊस पाडण्यास सुरूवात केलीय. #META हा हॅशटॅग सध्या ट्रेंडवर आहे. या ट्रेंडमध्ये आता मुंबई पोलिसांनी सुद्धा मजेदार मीम शेअर केलाय.

mumbai-police-join-facebook-name-change-trend
(Photo: Twitter/ Mumbai Police)

फेसबुकच्या रि-ब्रॅंडनंतर सोशल मीडिया यूजर्सनी मात्र वेगवेगळ्या मीम्सचा अक्षरशः पाऊस पाडण्यास सुरूवात केलीय. फेसबूक आता ‘मेटा’ नावाने ओळखलं जाणार असल्याची बातमी पसरल्यानंतर सोशल मीडियावर नेटिझन्सनी आपल्या क्रिएटिव्हीटीला सुरूवात केली. फेसबुकच्या या नव्या नावावरून ट्विटरवर खिल्ली उडवली जात आहे. फेसबूकला कंटाळून ट्विटरवर उड्या घेणारे युजर्स पुन्हा एकदा फेसबुकचा आनंद घेताना दिसून येत आहेत तर काही युजर्स मजेदार विनोदी मीम्स शेअर करत आहेत. यात मुंबई पोलीसही मागे नाहीत. सोशल मीडियावर #Meta हा हॅशटॅग सध्या ट्रेंड करतोय. हाच हॅशटॅग वापरत लोकांना लक्षात ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या नियमांची आठवण करून देत मुंबई पोलिसांनी एक मजेदार मीम शेअर केलंय.

मुंबईचे पोलीस बर्‍याचदा आपल्या मजेदार पोस्टसाठी चर्चेत येत असतात. मुंबई पोलिसांच्या सोशल मीडियावरील पोस्ट खूप मजेदार आणि मनोरंजक असतात. या मनोरंजक पोस्टच्या माध्यमातून मुंबई पोलीस लोकांना महत्त्वाचा संदेशही देतात. सध्या सोशल मीडियावर फेसबूकचं नवीन नाव ‘मेटा’वरून मीम्सचा महापूर पहायला मिळतोय. या ट्रेंडमध्ये ‘ग्लोब’ आणि ‘इंडिया’ यासारख्या कंपन्यांनी देखील आपली हटके क्रिएटिव्हीटी सादर करत सहभाग घेतलाय

या ट्रेंडमध्ये ब्रँड्सच्या पलीकडे जाऊन भारतीय पोलीस दलही विनोदी क्रिएटिव्ह शेअर करत ‘मेटाव्हर्स’ डायलॉग्सच्या क्रिएट्विव्हीटीमध्ये सामील झाले आहेत. नेहमीच आपल्या हटके मीम्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंबई पोलिसांनी सुद्धा या ट्रेंडमध्ये उडी घेतलीय. ‘नेव्हर मेटा…’ या विनोदी ट्रेंडमध्ये मुंबई पोलिसांनी एक मजेदार मीम शेअर केलंय. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश पोलिसांनी सुद्धा ‘मेटा’च्या नवीन लोगोवर मीम शेअर केलाय.

मुंबई पोलिसांनी एक फोटो शेअर ट्विट केलंय. यात ‘META’ या शब्दाला जोडत नागरिकांना करोना नियमांची आठवण करून दिलीय. “Met-A citizen without their mask on? Tell them they are not safe,” असं या फोटोमध्ये लिहण्यात आलंय. “जर तुम्हाला विना मास्क असलेले नागरिक दिसले की त्यांना सांगा की ते सुरक्षित नाहीत…” असा संदेश त्यांनी या फोटोच्या माध्यामतून दिलाय. हा फोटो शेअर करताना लिहिलेल्या कॅप्शनमधून त्यांनी ‘फेसबूक’ शब्दाची जोड देत हटके वाक्य लिहिलंय. “And that they may need to ‘Face’ the ‘Book’ of Law for violation #AccountOfSafety” अशी कॅप्शन त्यांनी लिहिलीय. जेणेकरून लोकं ते वाचतील आणि करोनाच्या वाढत्या प्रभावाला कमी करण्यास मदत मिळेल.

काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांनी करोना नियमांवरील आणखी एक मजेदार मीम प्रचंड व्हायरल झालं होतं. या पोस्टमध्ये मुंबई पोलिसांनी मनीषा कोइरालाच्या ‘खामोशी’ या चित्रपटाचे प्रसिद्ध गाणं ‘आज में उपर, आसमान निचे’ या गाण्याला हटके पद्धतीने वापरून एक संदेश दिला होता. ही पोस्ट सुद्धा प्रचंड व्हायरल झाली होती. तसंच नागरिकांनी हसू देखील आवरणं अवघड झालं होतं.

सोशल मीडियावर ट्रेंडनुसार क्रिएटिव्ह पद्धनीने लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी मुंबई पोलीस असे वेगवेगळे मीम्स शेअर करत असतात. त्यामुळे सोशल मीडियावर मुंबई पोलिसांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mumbai police join facebook name change trend go creative with meta facebook rebranding memes meta posts prp

Next Story
video : रक्तस्त्राव ‘तिला’ रोखू शकत नाही !
ताज्या बातम्या