सोशल मीडियावर तरुणांमध्ये सर्वाधिक प्रसिद्ध असलेल्या मुंबई पोलिसांच्या ट्विटर अकांऊटवर नेहमीच काहीतरी भन्नाट आणि वेगळं पाहायला मिळतं. नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी यासाठी हटके पद्धतीनं एखादी गोष्ट लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न नेहमीच या अकाऊंटवरून केला जातो. तर यावेळी सुरक्षेचं महत्त्व पटवून देण्यासाठी मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो शेअर केलाय जो सध्या खूपच व्हायरल होत आहे.
या फोटोद्वारे मुंबई पोलिसांनी सायबर सुरक्षेचं महत्त्व लोकांना पटवून दिलं आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या प्रत्येक नेटिझन्स आणि इंटरनेटद्वारे व्यवहार करणाऱ्या प्रत्येकानं आपल्या अकाऊंटची सुरक्षा घेतली पाहिजे हे समजावून सांगण्यासाठी हे मीम्स शेअर केलंय. अकाऊंट सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकांनी आपला पासवर्ड सेट करताना काही साध्या पण महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्याच पाहिजेत. तुमचा पासवर्ड तितकाच स्ट्राँग असला पाहिजे नाहितर तुम्ही अडचणीत येऊ शकता हे मुंबई पोलिसांनी ट्विटद्वारे समजावून सांगितलं आहे.
https://twitter.com/MumbaiPolice/status/1005695163354755077
काही दिवसांपूर्वी सार्वजनिक ठिकाणच्या सुरक्षेचं महत्त्व पटवून सांगताना या ट्विटर अकाऊंटवरून एक कोडं शेअर करण्यात आलं होतं. ज्याद्वारे प्रत्येक नागरिकांला त्यांच्या जबाबदारीची जाणीव करुन देण्यात आली होती.