Mumbai Traffic Cop Viral Photo: मुंबईत रविवारी रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत मुसळधार पावसानं हाहाकार माजवला. अनेक भागांत पाणी साचलं, लोकल उशिराने धावत होत्या, रस्त्यांवरील वाहनांच्या प्रचंड गर्दीने संपूर्ण शहर ठप्प झाल्यासारखं वाटत होतं. पण, अशा गंभीर परिस्थितीत एक धक्कादायक पण प्रेरणादायक फोटो समोर आला, ज्याने संपूर्ण सोशल मीडियावर खळबळ उडवलीय.

नुकताच मुंबईत पडलेल्या मुसळधार पावसाने शहराची परीक्षा घेतली. रस्ते जलमय, वाहतूक ठप्प आणि नागरिक त्रस्त अशा परिस्थितीत एक दृश्य मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारं ठरलं. जिथे महापालिकेने वेळेवर काम करायला हवं होतं, तिथे एक ट्रॅफिक पोलिस अधिकारी स्वतःच्या हाताने ड्रेनेजमधील खड्डे साफ करताना दिसला. ही घटना केवळ कौतुकास्पद नाही, तर मुंबईच्या प्रशासनावरही अनेक प्रश्न उपस्थित करणारी आहे. या व्हायरल फोटोने जिथे पोलिस कर्मचाऱ्याच्या समर्पणाला दाद मिळाली, तिथेच BMC वर नेटिझन्सनी संताप व्यक्त केला. पाहा, नक्की काय घडलं आणि मुंबईतल्या या ट्रॅफिक पोलिसाच्या ‘कर्तव्यापलीकडच्या’ कामगिरीने सोशल मीडियावर कसा गाजावाजा केला…

‘पोलिसाचं काम की पालिकेचं?’

पश्चिम द्रुतगती मार्गावर (Western Express Highway) एका वाहतूक पोलिसाचा फोटो व्हायरल झाला आहे, ज्यात तो मुसळधार पावसात पाण्यात भिजत, चिखलात रेंगाळत ड्रेनेजचे खड्डे स्वच्छ करताना दिसतोय. संबंधित पोलिसाचं नाव आहे गिरीश पाटील आणि ही कृती त्याच्या कर्तव्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त होती. मुंबई वाहतूक पोलिसांनी स्वतः हा फोटो शेअर करत लिहिलं, “पश्चिम द्रुतगती मार्गावर पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. ती कमी करण्यासाठी ऑन-ड्युटी रायडर गिरीश पाटील यांनी स्वतः ड्रेनेजचे खड्डे उघडून पाणी बाहेर जाण्याचा मार्ग मोकळा केला.”

नागरिकांकडून कौतुक आणि संताप दोन्ही

हा फोटो बघून अनेकांनी पाटील यांच्या समर्पणाचं कौतुक केलं. पण, याचबरोबर BMC म्हणजेच बृहन्मुंबई महानगरपालिकेवर संताप व्यक्त केला. नेटिझन्सनी सरळ सवाल केला, “हे काम वाहतूक पोलिसांचं आहे का?”, “BMC कुठं आहे?”, “साफसफाईची जबाबदारी कुणाची?”

मुंबईत पाणीच पाणी, ट्रेन, फ्लाइट सगळं उशिरा

अंधेरी, कुर्ला, मरीन ड्राईव्ह, सीएसएमटीसारख्या प्रमुख ठिकाणी पाणी साचलं. अंधेरी सबवे काही काळासाठी बंद करावा लागला. कुर्ला, साकीनाका आणि पवईसारख्या रस्त्यांवर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. हवामान विभागाने मुंबईसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून पुढील काही तासांत अजून पाऊस होण्याचा इशारा दिला आहे.

लोकल ट्रेनसेवा उशिराने चालत आहे. विशेषतः सेंट्रल आणि हार्बर लाईन्सवर हजारो प्रवासी अडकले. विमान वाहतूकही प्रभावित झाली असून इंडिगो आणि स्पाईसजेटने प्रवाशांना वेळेत पोहोचण्याचं आवाहन केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

…म्हणून विचार पडतो – जे दिसतंय ते खरंच असावं का? आणि हे काम कुणाचं, ते दुसरंच करत असेल तर खरेच ‘प्रशासन’ कुठे आहे?’