Ganeshgalli Mumbaicha Raja 2025 Video : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही आठवडे शिल्लक आहेत. त्यात मुंबईत गणेशोत्सवाचा एक वेगळा माहोल, जल्लोष असतो. जो अनुभवण्यासाठी प्रत्येक मुंबईकर उत्सुक असतो. त्यात विशेषत: मुंबईतील लालबाग, परळ, चिंचपोकळी, खेतवाडी परिसरात तर अनेक मंडळांमध्ये मोठमोठ्या बाप्पांचे आगमन होते. जे पाहण्यासाठी मुंबईच नाही, तर देश-परदेशांतूनही लोक येत असतात. मुंबईतील यात अनेक मोठ्या मंडळांमधील गणपती बाप्पाचे सुंदर देखावे अन् सजावटी हा अनेकांसाठी आकर्षणाचा विषय असतो. हेच देखावे पाहण्यासाठी लोक मंडळांमध्ये गर्दी करतात. त्यात मुंबईचा राजा, अशी ओळख असलेल्या गणेश गल्लीतही दरवर्षी अतिशय भव्य असा देखावा साकारला जातो. दरवर्षी नवनवीन सुंदर थीमवर हा देखावा साकारला जातो. यंदाची ही थीमही आगळीवेगळी आहे. ‘मुंबईच्या राजा’च्या देखाव्याची पहिली झलक आता समोर आली आहे, जी पाहून आता गणेशक्तांना प्रत्यक्षात हा देखावा पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. यंदा मुंबईच्या राजाचा दरबार कोणत्या थीमवर सजणार ते पाहू….

‘मुंबईच्या राजा’ची विलोभनीय भव्य थीम ( Mumbai Cha Raja Padyapujan Sohala 2025 Video)

दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईचा राजा गणेशोवत्स मंडळ भाविकांसाठी एक आगळीवेगळी थीम घेऊन आले आहे. यंदा ‘मुंबईचा राजा’चा दरबार तुम्हाला श्री रामेश्वरम मंदिराच्या प्रतिकृतीने सजलेला दिसणार आहे. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून १० जुलै रोजी मुंबईच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा पार पडला. यावेळी ‘मुंबईचा राजा’च्या दरबारी यंदा भाविकांना श्री रामेश्वराम मंदिराचा देखावा पाहायला मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, गणेशभक्त हा देखावा पाहण्यासाठी खूप उत्सूक आहेत. चला तर मग पाहूया श्री रामेश्वराम मंदिराची प्रतिकृती कशी तयार केली जात आहे ते.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तमिळनाडू राज्यातील रामेश्वरम बेटावर बसलेल्या श्री रामेश्वराम मंदिराचं भव्य असं प्रवेशद्वार सुरुवातीला दिसतय. त्यानंतर रामेश्वर मंदिरात ज्या प्रकारचे दगडांचे नक्षीकाम केलेले खांब आहेत, तसेच खांब उभारण्यात येणार आहेत. तसेच या खांबांच्या बाजूच्या भितींवर प्रभू श्रीराम आणि रावण यांच्यातील युद्धांचं चित्रण करण्यात आलं आहे. प्रभू श्रीरामांनी रावणाविरुद्ध केलेल्या युद्धात पापांचे क्षालन करण्यासाठी मंदिराच्या ठिकाणी वाळूचे शिवलिंग बनवून भगवान शंकराची आराधना केली होती. त्यावेळी हनुमंतही त्यांच्यासह होते. त्यानंतर तिथे श्री रामेश्वर मंदिराची स्थापना झाली. त्यामुळे या प्रतिकृती देखाव्यातही तुम्हाला याची कथा पाहायला मिळणार आहे. हा देखावा पाहून अगदी त्या काळात गेल्यासारखं वाटतंय. सोशल मीडियाच्या इन्स्टाग्राम अकांउटवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. भाविकांनीदेखील हा व्हिडीओ पाहून उत्सुकता दर्शवली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्याने मंडळांमध्ये बाप्पाच्या पाद्यपूजनाची, आगमनाची लगबग सुरू झाली आहे. त्यात सुंदर भव्य देखावे आणि सजावटीसाठ देखील तयारी आतापासून सुरू झाली आहे. सर्वांनाच बाप्पाच्या भेटीची ओढ लागली आहे. या वर्षी प्रत्येक मंडळ काहीतरी आगळेवेगळे करण्याचा प्रयत्न करीत आहे.