‘बजरंगी भाईजान’ सिनेमातील मुन्नी आठवतेय?, मग तिचा हा VIRAL VIDEO एकदा नक्की पाहा…

२०१५ साली आलेल्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटातून प्रेक्षकांच मन जिंकणारी मुन्नी तुम्हाला आठवतेय का? होय त्याच मुन्नीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागला आहे.

munni-aka-harshaali-malhotra
(Photo: Instagram/ harshaalimalhotra_03)

२०१५ साली आलेल्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटातून प्रेक्षकांच मन जिंकणारी मुन्नी तुम्हाला आठवतेय का? होय त्याच मुन्नीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागला आहे. मुन्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री हर्षाली मल्होत्रा ही आता मोठी झाली असून सोशल मीडियावर तिची बरीच क्रेझ आहे. बजरंगी भाईजानच्या ‘मुन्नी’ने ​या व्हिडीओमध्ये ​दबंग अभिनेता सलमान खानच्या गाण्यावर लिप-सिंक करत एक व्हिडीओ शेअर केलाय.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री झरीन खान यांच्या ‘वीर’ चित्रपटातील ‘सलाम आया’ या लोकप्रिय गाण्यावर ती लिप सिंक करताना दिसून येतेय. या व्हिडीओमध्ये तिने पारंपारिक पोशाख परिधान केलेला दिसून येतोय. जमिनीवर बसून मुन्नी उर्फ हर्षालीने या गाण्यावर दिलेले दिलखेचक एक्सप्रेशन्स पाहून नेटिझन्स फिदा झाले आहेत. हर्षाली आता मोठी होत असून ती अधिकच सुंदर दिसू लागली आहे. या गाण्यावर लिप-सिंक करतानाचा तिचा मनमोहक अंदाज सर्वांच्या पसंतीस पडताना दिसून येतोय. हर्षालीचा हा व्हिडीओ शेअर होताच तिचे फॅन्स ताबडतोड वेगवेगळे रिएक्शन देऊ लागले आहेत. तिच्या अदाबद्दल जास्त आणखी सांगण्यापेक्षा हा व्हिडीओ एकदा नक्की पाहाच.

‘बजरंगी भाईजान’ चित्रपटात मुन्नीच्या भूमिकेत दिसलेली हर्षाली मल्होत्राची ओळख देण्याची गरज नाही. हर्षालीने फॅन्सच्या मनात एक खास जागा बनवली आहे. सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. ती तिच्या इन्स्टाग्राम वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच तिचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. आतापर्यंत तिचा हा व्हिडीओ २ मिलियनपेक्षा ही जास्त लोकांनी पाहिलाय. तर १ लाख ४७ हजारपेक्षा जास्त लोकांनी लाइक केलंय.

याआधी हर्षाली मल्होत्राचा ‘जलेबी बेबी’ वर तयार केलेला हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये हर्षाली तिच्या आवडीच्या गोष्टी सांगताना दिसली. व्हिडीओसोबत दोन फोटोज ठेवून या दोन पर्यायांपैकी एक निवडून ती आपली निवड चाहत्यांसमोर ठेवले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Munni aka harshaali malhotra from bajrangi bhaijaan lip syncs to song from salman khans veer watch prp

ताज्या बातम्या