आयुष्यात चढ-उतार तर येतच असतात पण किती संकटे आली तरी त्यावर मात करून आपली स्वप्न पूर्ण करण्याची धमक काही लोकांमध्येच असते. परिस्थिती कितीही वाईट असली तरी काही लोक त्याला धैर्याने सामोरे जातात आणि आपलं ध्येय गाठतात. असे लोक इतरांना देखील आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देत असतात. असाच एक प्रेरणादायी व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चर्चेमध्ये आहे. एका फूड ब्लॉगर हा व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये एका दिव्यांग व्यक्तीचा समोसे विकताना दिसत आहे. आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो दिव्यांग व्यक्तींची तीन चाकी सायकल वापरुन समोसा विकत आहे. कोण आहे हा व्यक्ती आणि त्याचं स्वप्न नक्की आहे तरी काय हे जाणून घेऊ या.

दिव्यांग व्यक्तीला व्हायचे आयएएस ऑफिसर

व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या या दिव्यांग व्यक्तीला एक आयएएस अधिकारी व्हायचे आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो समोसे विकतो आहे. हा व्हिडिओ गौरव वासनच्या YouTube Swad Official नावाच्या पेजने इंन्स्टाग्राम वर शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये दिसणारा व्यक्ती नागपूर येथील असून त्याचे नाव सूरज आहे.

हेही वाचा : कलाकाराच्या ‘या’ कृतीमुळे वाहतूक कोंडी सोडवणाऱ्या पोलिसाच्या चेहऱ्यावर उमटले हसू, काय घडले? पाहा व्हिडिओ

दिव्यांग व्यक्तींची तीन चाकी सायकल वापरुन विकतोय समोसा
व्हिडिओमध्ये, सूरज त्याची तीन चाकी सायकल वापरून 15 रुपये प्रति प्लेटमध्ये समोसे विकताना दिसत आहे. त्याने नागपूर विद्यापीठातून बीएस्सी पूर्ण केले असूनही त्याला चांगली नोकरी मिळू शकली नाही. त्यामुळे काही पैसे कमावण्यासाठी आणि आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने समोसे विकण्याचा निर्णय घेतला.

सूरज दुपारी ३ ते संध्याकाळी ७ या वेळेत समोसे विकतो. “सिव्हिल सर्व्हिसेसचा अभ्यास करण्यासाठी तो समोसे विकतो. चला त्याला मदत करूया,” असे कॅप्शन फूड ब्लॉगर गौरवने इंन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओला दिले आहे.

हेही वाचा : तब्बल ५०० दिवस अंघोळ न करता २३० फुट खोल गुहेत राहिली महिला! पण का? जाणून घ्या

सुरजच्या जिद्दीचे सर्वांनी केलं कौतूक
सुरजचा व्हिडिओ काही काळातच सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.. सोशल मीडिया यूजर्सनी सूरजच्या जिद्दीला सलाम केला आणि त्याचे भरभरून कौतुक केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

” देव त्याला आणखी शक्ती देवो,” असे एकाने लिहिले.
दुसर्‍याने म्हटले की, ” त्याने त्याच्या अपंगत्वाचा त्याच्या आकांक्षांवर परिणाम होऊ दिला नाही हे प्रेरणादायी आहे.”