Nagpur police viral video: खर्रा खाऊन कुठेही थुंकणारे बरेच आहेत.मात्र नागरिकांकडून नियमांचं पालन करण्याची अपेक्षा असताना मात्र पोलीसच कायदा मोडत असतील, तर त्यांच्यावर कोण कारवाई करणार, हा खरा प्रश्न आहे. दरम्यान एक असंच संतापजनक प्रकरण सध्या नागपूरमधून समोर आलं आहे. यामध्ये एक पोलीस कर्मचारी खिडकीतून बाहेर थुंकला आणि त्याची थुंकी शेजारून जाणाऱ्या एका बाईकस्वारावर पडली. अन् पुढे काय घडलं हे आता तुम्हीच पाहा. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सामान्य लोकांनी काय आदर्श घ्यावा?

नागपूरच्या रस्त्यावर एका पोलीस कर्मचाऱ्याचा एका जोडप्याचा अंगावर खर्रा खाऊन थुंकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक दुचाकीस्वार जोडप्यावर पोलिसांनी थुंकल्याचा आरोप लावला आहे. रात्रीच्या वेळी रेड सिग्नल पडल्यावर थांबलेल्या या जोडप्यासमोर एक पोलिस कर्मचाऱ्याने भरलेली बस थांबली. याच बसमधील एक पोलिस कर्मचारी खर्रा खात होता, त्यानंतर पोलीसाने रस्त्यावर थुंकले. जे थेट सिग्नलला उभे असलेल्या जोडप्याच्या अंगावर पडले.रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी पसरलेली अस्वच्छता रोखण्यासाठी महापालिका प्रशासन वेगवेगळ्या मोहिमा राबवत असतात, दंडात्मक कारवाईही करतात. तरीही मनाई असताना काही लोकांकडून या नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत. मात्र आता हेच जर पोलीस करत असतील सामान्य लोकांनी काय आदर्श घ्यावा असा प्रश्न पडतो.

नेमकं काय घडलं?

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पोलीस वाहनाच्या खिडकून खर्रा खाऊन बाहेर थुंकले. त्यांची थुंकी थेट समोर दुचाकी घेऊन उभे असलेल्या दांपत्याच्या अंगावर उडली. असे झाल्याने दांम्पत्य पोलिसांना ओरडू लागले मात्र त्यावेळी काहीही प्रतिक्रिया न देता सिग्नल सुटताच पोलिसांचे वाहन तेथून पुढे निघाले. या घटनेमुळे दांपत्याचा संताप झाला आहे. तुमच्या अंगावर कुणी असं थुंकलं तर तुम्ही शांत रहाल का? असा प्रश्न व्यक्ती पोलिसांना विचारत आहे. तसेच असं वागताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे, असंही अशा शब्दांत या व्यक्तीने पोलिसांना खडेबोल सुनावले आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: पुणेकरांनी बिग बॉसचा विजेता ठरवला! कारवर लावलं असं पोस्टर की पाहून सगळेच थांबू लागले; पाहा कोण होणार विजेता

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच भडकलेले दिसताहेत. म्हणताहेत, “या जागी जर एखादा सामान्य माणूस असता तर पोलिसांनी त्याचं काय केलं असतं?” तर आणखी एकानं धर्मवीर चित्रपटाचा संदर्भ देत प्रतिक्रिया दिली आहे, “शिंदे साहेब धर्मवीर २ मध्ये असच एक सीन दाखवलं गेली तेंव्हा तुम्ही त्याच्या कानफाडत मारली. आता ही थुकणाऱ्यावर जरा कठोर करवाई करा, मग पोलीस असो किंवा सर्व सामान्य माणूस नियम सर्वांना समान लावा आणि त्यावर अंमलबजावणी होऊ द्या ही विनंती.”