सोशल मीडिया हे एक प्रभावी माध्यम म्हणून उदयास आले आहे. हे माध्यम कधी कोणाला स्टार बनवेल आणि कधी कोणाला जमिनीवर आणेल हे सांगता येणे कठीण आहे. सोशल मीडियामुळे बऱ्याच सामान्य माणसांचे दिवस रातोरात बदलले. याच उदाहरण म्हणजे रानू मोंडल किंवा कच्चा बदाम गाणं गाणारा फेरीवाला माणूस. एका व्हिडीओमुळे या दोघांचेही नशीब पलटले. यानंतर आणखी काही व्हिडीओ आले ज्यात भाजी विकण्याची स्टाइल वेगळी होती तर काहींची फळे विकण्याची पद्धत अनोखी होती.

दरम्यान, आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. यावेळी हा विक्रेता नमकीन विकत आहे. हा व्हायरल व्हिडीओ भोपाळचा असून लोकांना तो खूप आवडला आहे. हा व्हायरल व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला असून याच्या कॅप्शनमध्ये लिहलं आहे, ‘भोपाळी नमकीन वाला… भोपाळमध्ये टॅलेंटची कमी नाही…’

गच्च भरलेल्या बसमध्ये विद्यार्थ्याला गेटवर लटकून करावा लागत होता प्रवास, अचानक हात सुटला आणि…; पाहा धक्कादायक VIDEO

४५ सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये तुम्ही एका वृद्ध विक्रेत्याला एका जुन्या स्कूटरवर बॅग घेऊन बसलेले पाहू शकता. अगदी तरुणाप्रमाणेच त्यांनी बॉय असे लिहिलेली टोपी घातली आहे. ते नमकीन विकायला आले आहेत. मात्र ज्या पद्धतीने ते नमकीन विकत आहेत ती पद्धत कमाल आहे. ते गात आहे आणि गाता गाता ग्राहकांना त्यांच्या नमकीनची किंमत काय आहे हे सांगत आहे.

लाइव्ह कार्यक्रमातच मांजरीने पत्रकाराला मारली कानाखाली; हा Viral Video पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याला २ हजाराहून अधिक लोकांनी लाइक केले आहे, तर ४५० पेक्षा अधिक लोकांनी रिट्विट केले आहे. आतापर्यंत हा विडिओ ९३ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.