Viral video: नवरात्र सहसा नऊ दिवसांची असते, परंतु कधीकधी एकाच तिथीचे दोन दिवस येत असल्याने हा उत्सव दहा दिवसांपर्यंत वाढला जातो. यावेळी, तृतीया तिथी दोन दिवस आल्याने, नवरात्रीचे व्रत १० दिवसांसाठी आहे. २६ सप्टेंबर २०२५, शुक्रवार, आजचा रंग हिरवा आहे. जो निसर्ग, समृद्धी आणि संतुलन दर्शवितो. तो जीवनात ताजेपणा आणि सकारात्मक बदल आणण्याचे प्रतीक आहे. अशातच नवरात्रीच्या पाचव्या दिवशीच्या पार्श्वभूमीवर काही महिलांनी देवीचा जागर केला आहे.याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

सोशल मीडियावर अनेक डान्स व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ खूप मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे डान्स पाहायला मिळतात पण पारंपारिक डान्सची कुठेही तोड नाही. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. त्यामुळे आपल्या देशात अनेक पारंपारिक नृत्ये प्रसिद्ध आहे. जर महाराष्ट्राचा विचार केला तरी जिल्हा किंवा विभागानुसार वेगवेगळी परंपरा पाहायला मिळते.सध्या सोशल मीडियावर जोगव्याचा एक व्हिडिओ खूपच चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये जोगवा नृत्याची सुंदरता आणि त्यातल्या उत्साही शैलीला पाहून लोक आश्चर्यचकित होऊन त्या व्हिडिओला पसंती देत आहेत. यामुळे महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरा आणि लोककलांना नवीन पिढीला समजून घेण्याची संधी मिळत आहे.

‘जोगवा’ हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय नृत्य प्रकार आहे. यल्लमा देवीकडे जोगवा मागण्याची पद्धत आहे. जोगते आणि जोगतिण हा जोगवा मागत असतात. हे गाणं कुठेही ऐकलं की आपले पाय आपोआप थिरकायला लागतात.नवरात्र उत्सव हा देवी दुर्गाच्या नऊ रूपांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. श्त्रीशक्तीला हा उत्सव समर्पित केला गेल्याने वाईटावर चांगल्याच्या विजयाचे आणि दैवी शक्तीचे हा सण प्रतीक आहे. ‘नव’ म्हणजे नऊ आणि ‘रात्री’ म्हणजे रात्र या नऊ रात्रींमध्ये भक्त दुर्गा देवीच्या विविध रुपांची पूजा करतात. अशातच नवरात्री निमित्त काही हौशी महिलांनी देवीचा जागर केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ज्यात सहा जणींनी हिरव्या साड्या नेसल्या आहेत, कपाळावर भंडारा लावला आहे आणि आईचा जोगवा जोगवा मागेन म्हणत देवीचा जागर केला आहे.

पाहा व्हिडीओ

देवीचे नवरात्रीतील पाचवे रूप स्कंदमाता या नावे ओळखले जाते. भगवान स्कंद, ज्यांना आपण कार्तिकेय स्वामी या नावे ओळखतो. ते देवासूरांच्या युद्धात देवतांचे सेनापती असत. त्यांच्या ठायी असलेल्या दिव्य शक्तीमुळे त्यांना शक्तीधर असेही म्हटले जाते. त्यांनी मयुरावर स्वार होत अनेक युद्धांमध्ये विजयश्री मिळवली. त्यांची माता, म्हणून देवी दुर्गेला स्कंदमाता म्हणून ओळखले जाऊ लागले. पुत्रामुळे आईला ओळख मिळणे, हे कोणत्याही मातेसाठी भूषावह असते. स्कंदमातेला देखील आपल्या पुत्राच्या यशाचे कौतुक आहे, म्हणून ती गौरवाने स्वत:ला स्कंदमाता म्हणून मिरवते.नवरात्रीच्या पाचव्या दिवशी वात्सल्यरूपी स्कंदमातेचे पूजन केले जाते. या रूपात देवीच्या मांडीवर भगवान कार्तिकेय बाल्यरूपात विराजमान झालेले दिसतात. एका हाताने पुत्राला सांभाळत देवीने दुसरा हात आशीर्वादासाठी मोकळा ठेवला आहे आणि अन्य दोन हातात कमळ आहे.