सोशल मीडियावर सध्या एक अचंबित करणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे, या व्हिडीओमध्ये काहीजण चक्क एक घर खांद्यावरुन नेत असल्याचे दिसत आहेत. घराच्या खालच्या भागावर अनेक लाकडं बांधलेली दिसत आहेत, या लाकडांच्या साहाय्याने घर एका ठिकाणाहून दुसरीकडे घेऊन जात असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. पण यामागचे नेमके कारण काय असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

व्हायरल होणारा हा व्हिडी फिलीपिन्स येथील आहे. या व्हिडीओमध्ये काही व्यक्ती चक्क एक घर खांद्यावर उचलून घेऊन जात असल्याचे दिसत आहे. यामागचे कारण म्हणजे हे एका वृद्ध व्यक्तीचे घर आहे, हे घर कुटुंबातील इतर सदस्य राहत असलेल्या घरापासून लांब होते. या वृद्ध व्यक्तीला मुलं आणि नातवंडांबरोबर राहता यावे यासाठी त्यांचे घर कुटुंबातील इतर सदस्य राहत असलेल्या घराजवळ नेण्यासाठीचे प्रयत्न शेजाऱ्यांकडुन करण्यात आले. ७ फूट उंचीचे घर खांद्यावरुन नेण्याच्या या प्रयत्नानांना तब्बल २ तासानंतर अखेर यश मिळाले. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

आणखी वाचा : हरणावर हल्ला करण्यासाठी मगरीने डाव साधला अन्…; थरकाप उडवणारा व्हिडीओ होतोय Viral

व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : ‘जेव्हा ती एकटी…’ मुंबई लोकलमधील हा व्हिडीओ व्हायरल का होतोय एकदा पाहाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘गुड न्युज मोमेंट’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हायरल व्हिडीओला २७ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. शेजाऱ्यांच्या या मदत करण्याच्या भावनेने नेटकऱ्यांची मनं जिंकली असून, त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.