Viral video: सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ हसवतात काही व्हिडीओ रडवतात तर काही व्हिडीओ पाहून धक्का बसतो. हल्ली माणसं काहाही करण्याआधी कसालाही विचार न करता जे मनात येईल ते करतात. मग त्याचे परिणाम काय होतील याचा ते अजिबात विचार करत नाहीत. सख्खे शेजारी गुण्यागोविंदाने नांदताहेत, असे चित्र फारच अभावानेच पाहायला मिळते. असं म्हणतात की, अडचणीच्या वेळी शेजारीच सर्वात आधी तुमच्या मदतीला धावून येतो, पण हेच शेजारी तुमच्या जीवावर उठले तर. असाच एक धक्कादायक प्रकार सध्या समोर आला आहे. राग ही मानवी भावना आहे, जी प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. परंतु, रागाच्या अतिरेकामुळे अनेक समस्या उद्भवतात. क्षणभराचा राग सर्वकाही उध्वस्त करु शकतो. अशाच एका शेजाऱ्यानं त्याच्या घरासमोर बाईक लावली म्हणून रागात थेट बाईकच पेटवून दिली.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती घराबाहेर असलेल्या बाईकवर बसला आहे. यावेळी थोडावेळा ईकडे तिकडे पाहत उभा असल्याचं दिसतं, मात्र काहीच क्षणात तो खिशातलं माचीस काढतो आणि थेट बाईकमध्ये टाकतो. यावेळी क्षणात बाईक पेट घेते आणि तो व्यक्ती त्या ठिकाणाहून पळ काढतो. यावेळी तिकडे असणारी लहान मुलं आरडाओरडा करतात आणि सर्व लोक जमा होतात. त्यानंतर सर्वजण आग विझवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.

यानंतर शेजाऱ्यांच्या लक्षात येत की ती व्यक्ती आग लावून पळाली आहे, तेव्हा सर्वजण त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावताना दिसत आहेत. अशाप्रकारे टोकाचा निर्णय घेऊन सर्वांचाच जीव धोक्यात घालण्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. सुदैवानं मोठी आग लागली नाही, नाहीतर बाईकचा स्फोट होऊन आग आणखी वाढली असती.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ ghantaa नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, “हे फार चुकीचे आहे यामुळे किती मोठा अनर्थ होऊ शकतो याची कल्पना आहे का?” तर आणखी एकानं “क्षणभराचा राग अन् आयुष्यभर पश्चाताप होईल असं करु नका.” असं म्हंटलंय.