सोशल मीडिया दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ आपणाला थक्क करणारे असतात तर काही पोट धरुन हसायला लावणारे असतात. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये प्राण्यांशी संबंधित व्हिडिओंचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. प्राण्यांनी केलेल्या विविध आणि विचित्र कृती पाहून आपलंही मनोरंजन होतं. सध्या अशाच एका माकडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर अनेकांना आपलं हसू आवरणं कठीण होत आहे.

माकडाने पदभार स्वीकारला –

आपण जर एखाद्या ऑफिसमध्ये गेलो तर त्या विभागाच्या खुर्चीवर महिला किंवा पुरुष अधिकारी बसलेले दिसतात. त्यांच्याशिवाय त्या खुर्चीवर दुसरे कोणी बसण्याचं धाडस करत नाही. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये या अधिकाऱ्यांच्या खुर्चीमध्ये जे कोणी बसलं आहे ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल यात शंका नाही. हो कारण व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एका अधिकाऱ्याच्या खुर्चीमध्ये चक्क एक माकड बसल्याचं आहे. इतकेच नव्हे तर ते माकड टेबलवर ठेवलेल्या कॉम्प्युटरच्या कीबोर्डबरोबर खेळत असल्याचंही व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर हे माकड मनापासून कामात गुंतलं आहे, असं नेटकरी म्हणत आहेत. तर हा व्हिडीओ नेमका कोणत्या विभागातील आहे याबाबतची माहिती मिळालेली नाही.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माकडाचा हा अनोखा आणि मजेदार व्हिडिओ @Educators of Bihar नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये ‘उमेदवारांची प्रतीक्षा संपली आहे, आता निकाल जाहीर होणार आहे.’ असं लिहिलं आहे. तर हा व्हिडीओ आतापर्यंत १ लाख ३५ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर अनेकजण या मजेदार व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, “तो तिकीट काउंटरवर बसला आहे, सांगा तुम्हाला तिकीट कुठे हवे आहे.” दुसर्‍याने लिहिलं, उमेदवारांनी घेतलेल्या आक्षेपांवरती आम्ही विचार करत आहोत.”