जगात एकापेक्षा एक असे कलाकार असतात. जे आपल्या कलाकृतीने सर्वांना आश्चर्यचकित करतात. अशा अनेक कलाकृतींची झलक आपण पाहिली असेलच. काहींनी अप्रतिम कलाकृती लाकडावर तर काहींनी वाळूवर बनवलेल्या त्यांच्या कलाकृतीने सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. तर काही लोक आहेत जे अतिशय अनोख्या प्रकारची कलाकृती करतात. जी याआधी लोकांनी क्वचितच पाहिली असेल. आजकाल असाच एक आर्ट व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जो पाहून तुमचे मन नक्कीच चक्रावून जाईल.

स्त्रिया सौंदर्य वाढविण्यासाठी मेकअपचा वापर करतात. त्यामध्ये कधी आयलायनर, कधी लिपस्टिक तर कधी मेकअपशी संबंधित इतर गोष्टींचा वापर केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का की या मेकअप किटमधून उत्कृष्ट कलाही निर्माण होऊ शकते, ज्याला तुम्ही विचित्र किंवा भीतीदायकही म्हणू शकता. व्हायरल व्हिडीओमध्ये एका महिलेने तिच्या संपूर्ण चेहऱ्यापासून कपाळापर्यंत अशी कला केली आहे की, सर्वत्र फक्त डोळे, नाक आणि ओठ दिसत आहेत. त्याच्याकडे बघून कळत नाही की त्याचे खरे डोळे, नाक, ओठ कुठे आहेत? या व्हिडीओमध्ये अशाच आणखी काही सुंदर कला पाहायला मिळतात, ज्या पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण जाईल.

( हे ही वाचा: सिंहणींच्या कळपाने एका झटक्यात केली बिबट्याची शिकार; व्हायरल व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल

व्हिडीओमध्‍ये ही मनाला भिडणारी कला पहा

( हे ही वाचा: ४८ तासात १३८ वेळा थांबले हृदयाचे ठोके; अ‍ॅपल वॉचने वाचवला तरुणाचा जीव)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा सुंदर आर्ट व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर आर्ट वर्ल्ड नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला असून त्याला ‘नेक्स्ट लेव्हल मेकअप आर्ट’ असे नाव देण्यात आले आहे. ३४ सेकंदांचा हा व्हिडीओ आतापर्यंत ४ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर १२ हजारांहून अधिक लोकांनी व्हिडीओला लाईकही केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी याचे वर्णन अद्भुत कला म्हणून केले आहे, तर काहींनी याला भयानक म्हटले आहे.