Mumbai local viral video: मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन कायमच खचाखच भरलेली असते. मुंबईच्या उपनगरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रवासासाठी लोकल ट्रेन सर्वात कमी खर्चिक पर्याय आहे. त्यामुळे शेकडो नागरिक ट्रेननेच प्रवास करतात.मुंबईमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी येणाऱ्या लोकांमुळे ही गर्दी वाढत आहे. या मुंबई लोकलची गर्दी हीच तिची खरी ओळख आहे असं म्हणायला हरकत नाही. मात्र ही गर्दी आता शारीरिकदृष्टया अपंग, कर्करोगी आणि गर्भवती महिला यांच्यासाठी रेल्वेच्या लोकल गाडय़ांमध्ये राखीव असलेल्या डब्यांतही शिरत आहे. इतर धडधाकट प्रवाशांचाच भरणा होत असल्याने गरजू प्रवाशांना त्रास होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. असाच डोंबिवली रेल्वे स्टेशनवरचा एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

रेल्वेच्या नियमांनुसार या डब्यातून इतर प्रवाशांनी प्रवास करण्यास बंदी आहे. असे करताना कोणी आढळल्यास त्यावर कारवाई केली जाते. मात्र हा नियम धाब्यावर बसवून अशा डब्यांमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच मोठी असल्याची तक्रार अपंग प्रवासी सातत्याने करत असतात. अनेकदा तर इतर प्रवासी या अपंग प्रवाशांना दम देण्याचे प्रकारही घडले आहेत. लोकलच्या इतर डब्यांतील गर्दी टाळण्यासाठी बऱ्याचदा प्रवासी आणि साध्या वेशातील पोलीसही या अपंगांसाठीच्या डब्याचा आसरा घेतात. अशा वेळी अपंगांच्या डब्यांतील लोकांकडून त्यांना मज्जाव केला गेल्यास बऱ्याचदा भांडणेही होतात. याबाबत रेल्वेच्या हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार नोंदवली, तरी रेल्वे पोलीस किंवा रेल्वे सुरक्षा दल यांच्याकडून कोणतेही सहाय्य मिळत नसल्याचा आरोपही केला जातो.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी लोकल डोंबिवली स्टेशनवर येताच लोकांनी अक्षरश: दिव्यांगांच्या डब्यात शिरण्यासाठी धक्काबुक्की सुरु केली. आधीच तो डब्बा इतर प्रवाशांनी खचाखच भरलेला होता त्यात डोबिंवलीच्या प्रवाशांची डब्यात चढण्यासाठी मारामारी सुरु झाली. यावेळी याठिकाणी काही वयस्कर आजीही होत्या. मात्र दिव्यांग डब्यात सामान्यांची खचाखच गर्दी इतकी होती की मग दिव्यांग प्रवासी प्रवास तरी कसा करतील?

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान सोशल मीडियावर हा व्हिडीओ nitingaikawa इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.