नागपूर जिल्ह्यातील पारशिवणी नगरपंचायतीने आयोजित केलेल्या समाजप्रबोधन कार्यक्रमात अश्लील नृत्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. या नृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार सुरू असताना या ठिकाणी अधिकारी आणि पदाधिकारीही उपस्थित होते. त्यामुळे या प्रकारावर काय कारवाई होते याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

पारशिवणी नगरपंचायतीने समाजप्रबोधन कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला पथनाट्यद्वारे समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर नृत्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात नृत्यांगनाने अश्लील हावभाव करत नृत्य केले. इतकेच नाही, तर नृत्य सुरू असताना काही नागरिकही या नृत्यांगनासोबत अश्लील हावभाव करत नाचू लागले. नृत्यांगणाने स्टेजखाली आणि स्टेजवर येऊन नाचणाऱ्या नागरिकांसोबत अश्लील नृत्य केले.

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : Gautami Patil Lavani: गौतमी पाटील लावणी करताना प्रेक्षकांनी काठ्या फेकून मारल्या अन तितक्यात…

हा व्हिडिओ व्हायरल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे अश्लील नृत्य सुरू असताना या कार्यक्रमात अधिकारी, पदाधिकाऱ्यांसह महिलाही उपस्थित होत्या. असं असताना घडलेल्या या प्रकाराने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नागरिकांमधून आयोजकांवर कारवाईची मागणीही होत आहे. त्यामुळे आता प्रशासन या प्रकारावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.