ओडिशाच्या कालाहांडी जिल्ह्यातील धर्मगड उपविभागीय रुग्णालयात डॉक्टरांनी एका तरुण रुग्णाला बेदम मारहाण केल्याची विचित्र घटना समोर आली आहे. पोलिसांनी आज मंगळवारी ही माहिती दिली. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यामध्ये डॉक्टर रुग्णाला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. डॉक्टरांनी रुग्णाला जमिनीवर लोळून चपलेने मारहाण केल्याचं या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. त्यानंतर रुग्णाला लाठ्या-काठ्यांनी मारहाणही करण्यात आली. त्यानंतर सुरक्षा रक्षकांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.

या प्रकरणी स्थानिक लोकांनी सांगितले की, रविवारी रात्री १०.३० च्या सुमारास धरमगड परिसरातील एक व्यक्ती पोटात प्रचंड दुखत असल्याच्या तक्रारीमुळे रुग्णालयात गेला होता. रूग्णालयात गेल्यानंतर तिथे कोणीही डॉक्टर न दिसल्याने त्यांनी गजर केला. यानंतर रूग्णालयातील डॉक्टर शैलेशकुमार डोरा यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर डॉक्टर डोराने रुग्णाला मारहाण करण्यास सुरूवात केली.

“पोटात असह्य दुखू लागल्याने मी दवाखान्यात गेलो तेव्हा माझी काळजी घेण्यासाठी एकही डॉक्टर तेथे उपस्थित नव्हता”, असा आरोप पीडित मुकेश नाईकने केला आहे. यापुढे बोलताना मुकेश म्हणाला, “मी सुरक्षा रक्षकाला विचारले असता त्याने सांगितले की, डॉक्टर वॉशरूमला गेले आहेत. काही वेळाने वैद्यकीय कर्मचार्‍यांपैकी एकाने दोन इंजेक्शन्स दिली. मी स्ट्रेचरवर होतो. त्यावेळी डॉक्टर अचानक माझ्याजवळ आले आणि त्यांनी मला मारहाण करण्यास सुरुवात केली.”

आणखी वाचा : Viral Video : नवरीला पाहताच नवरदेव चक्कर येऊन स्टेजवरच कोसळला

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : Viral Video : जीव वाचवण्याचा थरार व्हिडीओत कैद, पोटच्या लेकराला दुसऱ्या मजल्यावरून फेकलं…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉक्टरांच्या अटकेच्या मागणीसाठी रुग्ण आणि स्थानिक लोकांनी सोमवारी रास्ता रोकोही केला. डॉक्टर आणि रुग्णाच्या वतीने स्थानिक पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. धरमगडचे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) धीरज कुमार चोपदार म्हणाले, “आम्ही गुन्हा दाखल केला असून या घटनेबाबत डॉक्टरांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.’