scorecardresearch

Viral Video : जीव वाचवण्याचा थरार व्हिडीओत कैद, पोटच्या लेकराला दुसऱ्या मजल्यावरून फेकलं…

एक आई जितकं आपल्या बाळावर प्रेम करते तितकंच प्रेम वडील देखील करतात. याचिच प्रचिती देणारा एक व्हिडीओ सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये वडिलांनी आपल्या पोटच्या लेकराला आगीपासून वाचवण्यासाठी दुसऱ्या मजल्यावरून फेकलं. पाहा हा व्हायरल व्हिडीओ

Fater-Son-Viral-Video
(Photo: Twitter/ SoBrunswickPD)

एक आई जितकं आपल्या बाळावर प्रेम करते तितकंच प्रेम वडील देखील करतात. अर्थात आईला आपलं प्रेम व्यक्त करता येतं पण बाबांचे अश्रू दिसत नाहीत. त्यामुळे त्यांच्या प्रेमाला अनेकदा दुह्यम दर्जाच मिळतो. अर्थात वेळ आली की बाबा देखील आपल्या बाळासाठी काहीही करू शकतात. अन् याचिच प्रचिती देणारा एक व्हिडीओ सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये वडिलांनी आपल्या पोटच्या लेकराला आगीपासून वाचवण्यासाठी दुसऱ्या मजल्यावरून फेकलं. त्यानंतर ते स्वतः दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतात. या वडिलांचं प्रेम पाहून सारेच जण भावूक होऊ लागलेत. हा व्हिडीओ पाहून पाहणाऱ्यांच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ अमेरिकेतला असल्याचं सांगण्यात येतंय. अमेरिकेतील न्यू जर्सी येथील साउथ रिज वुड अपार्टमेंट इथे भयंकर आग लागली होती. या आगीत एक तीन वर्षाचा मुलगा आणि त्याचे वडील अडकले होते. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की इमारतीला आग लागल्यानंतर तिथल्या लोकांनी इकडून तिकडे धावाधाव घेण्यास सुरूवात केली. बचावासाठी इमारतीत अडकलेल्या लोकांनी आरडााओरड करण्यास सुरूवात केली असल्याच दिसून येतंय. अग्नीतांडव पाहून समोर उभा असलेला मृत्यू पाहून अखेर या वडिलांनी आपल्या लेकराचा जीव वाचवण्यासाठी एक शेवटचा प्रयत्न करण्याचं ठरवलं.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : साउथ सुपरस्टार विजयच्या ‘हलमिथी हबीबो’ गाण्यावर BTS बॅण्ड बॉईजचा डान्स, एकदा पाहाच

इमारतीला लागलेली आग इतकी भयानक होती की घराच्या खिडकीतून सुद्धा बाहेर पडणं अशक्य होतं. इमारतीखाली अग्मिशमन दलाचे अधिकारी आणि पोलिस उभे असल्याचं या वडिलांनी पाहिलं. त्यानंतर आपल्या लेकराचा जीव वाचवण्यासाठी या पित्याने मोठी जोखीम उचलली. तब्बल दुसऱ्या मजल्यावरून वडिलांनी आपल्या तीन वर्षाच्या मुलाला फेकलं.

दुसऱ्या मजल्यावर उभे असलेले वडील स्वत:ला आणि मुलाला आगीपासून वाचवण्याचा कसा प्रयत्न करत आहेत, हे व्हिडीओमध्ये दिसत आहे. दुसऱ्याच क्षणी बचावकर्ते वडिलांना पाहतात आणि ते इमारतीच्या खाली पोहोचतात. बचावकर्ते त्या वडिलांना त्यांच्या मुलाला खाली फेकण्यासाठी हातवारे करतात आणि त्यांना पाहून वडील त्यांच्या मुलाला बचावकर्त्यांच्या दिशेने फेकतात. बचावकर्ते सुद्धा त्या मुलाला झेलून घेतात. त्यानंत वडिलांनी सुद्धा दुसऱ्या मजल्यावरून उडी घेत आपला जीव वाचवला.

आणखी वाचा : आईला वैतागून चिमुकलीने देवाकडे केली ही प्रार्थना, Viral Video पाहून तुम्ही सुद्धा पोट धरून हसाल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : नशीब म्हणायचं की चमत्कार? भल्यामोठ्या ट्रकनं उडवलं, तरीही वाचला जीव; पाहा Shocking VIDEO

@SoBrunswickPD नावाच्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ४५ सेकंदांच्या या व्हिडीओला ८ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स अधिकारी आणि वडिलांचे जोरदार कौतुक करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video of father who throws out child 2nd floor to save him from fire then jumped himself trending video went viral prp

ताज्या बातम्या