Viral Video : बहीण भावाचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात काळजी, प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी असते. बहीण भाऊ एकमेकांबरोबर कितीही भांडत असले तरी ते क्षणभरही एकमेकांशिवाय राहत नाही. सोशल मीडियावर बहीण भावाचे कधी मस्ती करतानाचे तर कधी खेळतानाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. चिमुकल्या बहीण भावाचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असेल पण सध्या एका वृद्ध बहीण भावाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भारावून जाल. काही लोकांना त्यांचे बहीण भाऊ आठवतील.
या व्हायरल व्हिडीओमध्ये दोघे वृद्ध बहीण भाऊ दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक वृद्ध आजोबा खाली बसलेले आहे आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवून त्यांची वृद्ध बहीण झोपली आहे. बहीण भावाचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “भाऊ हा फक्त भाऊ नसतो, तो सुख दु:खाचा साथीदार असतो.”
बहीण भावाच्या नात्यातील प्रेम, काळजी, जिव्हाळा वयानुसार वाढत जातो. हा व्हिडीओ पाहून कोणीही भावूक होईल.
हेही वाचा : लेकीसाठी काय पण! मुलीला फक्त श्रीमंत कुटुंबातूनच स्थळे यावीत म्हणून वडिलांनी ३ लाख रुपयांचं काय केलं पाहा
पाहा व्हायरल व्हिडीओ
हेही वाचा : गौतमी पाटीलही आजीसमोर फिकी पडेल! भन्नाट डान्स स्टेप्स अन् चेहऱ्यावरील हावभाव; डान्स व्हिडीओ व्हायरल
sundarabai1948 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “सुख दुःखाचा साथीदार” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “निस्वार्थी प्रेम,ही शेवटची पिढी , आजकाल नाते निभवायला वेळ नाही कोणाकडे” तर एका युजरने लिहिलेय, “शेवटची पिढी” आणखी एका युजरने लिहिलेय, “बहीण नसल्याची किंमत त्याला विचारा ज्याला बहीण नसते.” एक युजर लिहितो, “बहीण भावाचं नातं खूप भारी असते पण काहीजणांना भेटत नाही. काही लोकांना भाऊ नसतो तर काही लोकांना बहीण नसते “