भारतीय क्रिकेट संघातील दिग्गज खेळाडू आणि माजी कर्णधार असलेल्या विराट कोहलीचा मोठा चाहतावर्ग आहे. खेळाची वेगळी शैली, हटके फॅशन स्टाइल अशा गुणांमुळे त्याने अनेकांची मने जिंकली आहेत. तो फक्त मॉडेलिंगमध्येच नव्हे तर नृत्य आणि गाण्यातही टाॅपवरच आहे. अनेकदा सोशल मिडीयावर त्याचे कधी नृत्य करतानाचे तर कधी गातानाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात, जे पाहून चाहतेही फार आनंदी होत असतात. आता असाच एक जुना असलेला विराट कोहलीचा खास व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो गाताना दिसत आहे.
अलीकडेच विराटचा पंजाबी गाणे गातानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो ऐकल्यानंतर तुम्हालाही तिथे उपस्थित असलेल्या लोकांप्रमाणे टाळ्या वाजवायला भाग पडेल. विराट कोहलीने गुरुदास मानचे गाणे गायले अन् उपस्थित सर्व लोकांनी मने जिंकून घेतली. विराटचे हे गाणे तिथे उपस्थित असलेले सर्वजण तल्लीन होऊन ऐकत आहेत. गाणे संपल्यानंतर सर्वांनी विराटला भरभरून टाळ्यांचा कडकडाट करत दाद दिली. आता हा जुना व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
(हे ही वाचा : विराट कोहली विमानात दिसताच प्रवाशांनी गुपचूप बनवला क्यूट Video, साधेपणा पाहून नेटकरी म्हणाले, “डाउन टू…”)
खेळाडू हरभजन सिंगची पत्नी गीता बसरा हिने विराट कोहलीचा हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो हरभजन सिंगसोबत गुरदास मानचे पंजाबी गाणे गाताना दिसत आहे. यावेळी त्याच्यासोबत मंचावर नीता अंबानी व्यतिरिक्त त्यांची मुलगी ईशा अंबानी, मनीष मल्होत्रा, शेखर, परिणीती चोप्रा आणि इतर अनेक स्टार्स मंचावर उपस्थित आहेत, परंतु सर्वांच्या नजरा फक्त विराट कोहलीकडेच खिळल्या आहेत. विराट कोहली उच्च स्वरात गातो की त्याचे कौशल्य पाहून हरभजन सिंगही गाणे थांबवतो आणि फक्त विराट कोहलीचा आवाज ऐकू येतो.
हा व्हिडीओ शेअर करताना गीता बसरा यांनी लिहिले आहे की, “विराट कोहलीला त्याच्या वाढदिवशी यापेक्षा चांगले गिफ्ट काय देऊ शकते, या व्हिडिओद्वारे त्याच्या चाहत्यांना त्याच्या इतर टॅलेंटबद्दलही कळेल.” विराट कोहलीचा हा व्हिडिओ पाहून त्याचे चाहते त्याच्यावर पुन्हा एकदा प्रेमाचा वर्षाव करत आहेत. अनेकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला असून इमोजी शेअर करुन त्याचे कौतुक करत आहेत.