scorecardresearch

Viral Video : पार्टी करणाऱ्या लोकांना सिंहिणीने दिलं ‘सरप्राईज’, एका व्यक्तीच्या मागेच पडली!

सिंह आणि सिंहीणींपासून नेहमीच थोडे अंतर राखणे कधीही चांगलेच. व्यक्तीचं नशीब खराब असेल तर हे प्राणी कधीही तुमच्यासमोर धडकू शकतात.

Viral Video : पार्टी करणाऱ्या लोकांना सिंहिणीने दिलं ‘सरप्राईज’, एका व्यक्तीच्या मागेच पडली!
(Photo : Instagram/ lions.habitat)

Lioness Targeting Guest At A Party : वन्य प्राण्यांच्या जवळ जाणे चांगले नाही किंवा आपण त्यांच्याशी अजिबात मस्ती करू नये. विशेषतः जर ते सिंह आणि सिंहीण असतील तर, त्यांच्यापासून नेहमीच थोडे अंतर राखणे कधीही चांगलेच. जेणेकरून तुमचे नुकसान होणार नाही. तरीही त्या व्यक्तीचं नशीब खराब असेल तर हा भयानक जंगली प्राणी तुम्हाच्यासमोर कुठेही धडकू शकतो. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, ज्या मध्ये सिंहीण एका पार्टीत पोहोचली आहे.

लग्न-समारंभात किंवा कोणत्याही फंक्शनमध्ये न बोलावलेले पाहुणे कोणालाच आवडत नाहीत. तरीही हा पाहुणा माणूस असेल तर त्याला मॅनेज करता येईल पण सिंहिणीला मॅनेज करणं सोपं नसतं, यावेळी एका पार्टीत आलेल्या सिंहिणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका सजवलेल्या ठिकाणी सिंहीण आल्याचा हा व्हिडीओ पाहून लोक थक्क झाले आहेत आणि ती ज्या पद्धतीने एका माणसाच्या मागे लागली आहे, तो हृदय पिळवटून टाकणारा आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : बायको बॉयफ्रेंडसोबत स्कूटीवर फिरत होती, नवरा फिल्मी स्टाईलमध्ये पाठलाग करत होता आणि मग…

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक सिंहीण सजावट केलेल्या एका ठिकाणी पोहोचताना दिसत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतरच तुम्हाला हसू येईल. कारण पार्टीच्या ठिकाणी उभी असलेली सिंहीण फक्त तिथे पोहोचली नाही तर ती एका व्यक्तीच्या मागे पडली आहे. तो माणूस सिंहीणीपासून वाचण्यासाठी थेट झाडावर चढला, पण सिंहीण हात धुवून त्याच्या मागे पडली आहे. ती व्यक्ती वर चढत असताना चवताळलेली सिंहीण त्याच्या मागे येते आणि झाडावरही चढते. त्याचवेळी तो माणूस शेवटच्या क्षणापर्यंत पाय मारून जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचे हृदय हेलावून जाईल.

आणखी वाचा : उगाच काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणत नाहीत…हा VIRAL VIDEO पाहून तुम्हीही असंच म्हणाल!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : रस्त्यावर काम करून पक्ष्यांची भूक भागवतो हा व्यक्ती, मनाला भावणारा हा VIRAL VIDEO एकदा पाहाच!

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर lions.habitat नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ ५ जुलै रोजी शेअर करण्यात आला असला तरी तो आतापर्यंत १६.५ दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिला आहे आणि सुमारे २ लाख ५० हजार लोकांनी याला लाईक केले आहे. व्हिडीओ पाहून लोकांमध्ये भीतीचे वातावरण असून ते वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या