Telangana IPS Officer Accident : तेलंगणातील एका मंत्र्याच्या ताफ्यातील कारने एका आयपीएस अधिकाऱ्याला धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भद्रादी कोठागुडेम जिल्ह्यातून कॅबिनेट मंत्री श्रीधर बाबू यांच्या ताफ्यातील एका भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाने आयपीएस अधिकारी परितोष पंकज यांना जोरदार धडक दिली. या धडकेत आयपीएस अधिकारी परितोष पंकज गंभीर जखमी झाले असून त्याना उपचारांसाठी हैदराबादमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ताफ्याला मार्गदर्शन करत असताना मागून येणाऱ्या वाहनाने त्यांना धडक दिल्याने ते की उडून जमिनीवर कोसळल्याची घटना घडली. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्या भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यातील एका कार्यक्रमापूर्वी तेथील सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्री श्रीधर बाबू गेले होते, त्याचवेळी ही अपघाताची घटना घडली. या घटनेचा एक सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे, ज्यात आयपीएस अधिकारी परितोष पंकज यांच्यासह अनेक पोलिस अधिकारी ताफ्याला मार्गदर्शन करत असल्याचे दिसून येते. मंत्र्यांचा ताफा रस्त्याने मैदानाच्या दिशेने दाखल होत असताना अधिकारी रस्त्यावर उभे राहून या सूचना देत होते. मात्र, यादरम्यान चुकून अधिकारी मंत्र्यांच्या ताफ्यातील कारसमोर आले. यावेळी वाहनाने त्यांना मागून जोरदार धडक दिली. कारची धडक बसताच पंकज हवेत उडून थेट रस्त्याच्या बाजूला जाऊन पडले. थोडक्यात ते चाकाखाली येण्यापासून बचावले. पण, त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. आता त्यांना उपचारांसाठी हैदराबादमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कर्तव्य बजावताना अधिकाऱ्याबरोबर घडलेल्या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. मात्र, या घटनेनंतर इतर पोलिस सहकारी व अधिकाऱ्यांनी त्यांना तात्काळ उचलून उपचारांसाठी रुग्णालयात नेले.