Optical illusion Hidden Cat Challenge: इंटरनेटवर रोज नवनवीन फोटो आणि व्हिडीओ पाहून आपण कंटाळलो आहोत असं वाटत असतानाच अचानक एखादं असं कोडं समोर येतं, जे डोळे आणि मेंदू दोन्हींची कसरत करून घेतं. अशा पझल्सना ऑप्टिकल इल्युजन म्हटलं जातं; जिथे दिसतं ते खरं नसतं आणि जे खरं आहे ते डोळ्यांना सहजासहजी सापडत नाही.

सध्या सोशल मीडियावर एक असंच थरारक आव्हान धुमाकूळ घालत आहे. प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका यांनी शेअर केलेल्या एका फोटोमध्ये गर्दीच्या मधोमध एक मांजर लपलेली आहे. दिसायला साधा फोटो, पण या मांजरीला शोधणं म्हणजे अक्षरशः डोळ्यांशी आणि मेंदूशी शर्यत लावणं.

यात खास ट्विस्ट असं की, ही मांजर तुम्हाला शोधण्यासाठी फक्त १० सेकंद दिलेले आहेत. जर त्या वेळेत उत्तर सापडलं, तर तुम्ही ऑप्टिकल इल्युजनचे ‘खरे खेळाडू’ मानले जाल. पण, जर नाही जमलं तर तुम्हीही त्या हजारो लोकांच्या रांगेत सामील व्हाल, ज्यांनी डोळे लावून पाहिले तरी मांजर सापडलीच नाही.

आता तुमच्यासमोर प्रश्न आहे, तुम्ही या पझलचं आव्हान स्वीकारणार का? की दहा सेकंद संपल्यानंतर हार मानून उत्तर बघायला तयार होणार? पाहता क्षणी हा फोटो अगदी साधा वाटतो; पण जरा लक्षपूर्वक बघितलं तर डोळ्यांचा आणि मेंदूचा खेळ सुरू होतो.

युजर्स झाले हैराण

हा फोटो समोर येताच नेटिझन्सनी झपाट्याने प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. एकाने गमतीत लिहिलं, “जर हीच मांजर असेल तर या चित्रात मला संपूर्ण प्राणीसंग्रहालयच सापडेल!” दुसरा म्हणाला, “मी तब्बल पाच मिनिटं हा फोटो पाहत राहिलो, पण मांजर काही सापडली नाही, खूप कठीण आहे हे चॅलेंज.”

तिसऱ्याने तर कबूल केलं की, “ही कोडी म्हणजे व्यसनासारखी आहेत. माझा पूर्ण चहा ब्रेक या पझलमध्ये गेला.” आणखी एकाने लिहिलं, “ज्या क्षणी मांजर दिसली, मला वाटलं की मी जीनियसच आहे!” तर पाचव्या युजरने म्हटलं, “मी तर जवळजवळ हार मानली होती, पण अचानक मांजर नजरेसमोर आली; काय दिलासा मिळाला!”

येथे पाहा फोटो

शेवटी उत्तर समोर आलं

बर्‍याच जणांनी हार मानल्यानंतर शेवटी या पझलचं उत्तर समोर आलं. जर तुम्ही अजूनही चित्रात डोळे खुपसून पाहत असाल तर आता लक्ष द्या लाल रंगाच्या वर्तुळात ती मांजर नीट दिसून येते.

हा व्हिडीओ-पझल केवळ मनोरंजनापुरता नाही तर मेंदूला चालना देणारा आहे, कारण मेंदू आणि डोळ्यांची एकाग्रता तपासणारे असे पझल्स नेहमीच लोकांना खिळवून ठेवतात.

आता प्रश्न आहे, तुम्ही १० सेकंदांत ही मांजर शोधू शकता का? की उत्तर पाहिल्यावरच सुटकेचा नि:श्वास टाकणार?