scorecardresearch

Optical Illusion: ‘या’ फोटोत लपलेली खारुताई तुम्हाला सापडतेय का?

Optical Illusion: सध्या सोशल मीडियावर अनेक ऑप्टिकल इल्युजन असलेले फोटो व्हायरल होत असतात.

Optical illusion squirrel
तुम्ही देऊ शकता योग्य उत्तर (फोटो: सोशल मीडिया)

हे सांगण्याची गरज नाही की, ऑप्टिकल इल्युजन असलेले फोटो आणि कोडी खूप मजेदार असतात आणि म्हणूनच ते सोशल मीडियावर व्हायरल होतात. इंटरनेट मनोरंजक ऑप्टिकल इल्युजन चाचण्यांनी भरलेले आहे जे तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू प्रकट करतात. काही फोटो तुमची एकाग्रता पातळी आणि छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देण्याची चाचणी घेतात. हे फोटो तुमच्या मेंदूसाठी उत्तम व्यायाम तर आहेतच पण तुमच्या डोळ्यांना तीक्ष्ण करण्यासही मदत करतात.

या बर्फाच्छादित चित्रात तुम्हाला खारुताई दिसली का?

असाच एक बर्फाच्छादित डोंगरी रस्त्याचा फोटो व्हायरल झाला आहे. तुम्हाला फक्त फोटोत लपलेली खारुताई शोधायची आहे. फोटोत तुम्ही एक पर्वतीय मार्ग पाहू शकता, जो पांढर्‍या बर्फाच्या चादरीने झाकलेला आहे. फोटोत कुठेतरी एक पांढरी खारुताई खडकाळ प्रदेशात लपलेली आहे. पण ते शोधणे तुम्हाला वाटते तितके सोपे नाही. चांगली दृष्टी तीक्ष्ण असलेल तिच व्यक्तीच ते पाहू शकेल.

(हे ही वाचा: Optical Illusion: धबधबा आहे की पांढरे कपडे घालून उभे असलेले लोक? उत्तरात दडले आहे रहस्य)

तुम्हाला दिसली का खारुताई ?

तुम्ही खारुताई शोधली असेल तर तुमचे अभिनंदन परंतु, तुम्हाला सापडली नसेल तर आम्ही मदत करण्यासाठी येथे आहोत. प्रथम, फोटोच्या शीर्षस्थानी पहा. तुम्हाला बर्फात एक छोटी पांढरी रंगाची खारुताई दिसेल. फोटोवर झूम करा आणि तुम्ही ते सहज पाहू शकता.

(हे ही वाचा: Puzzle: ‘या’ फोटोतील हत्तीला किती पाय आहेत? तुम्ही सांगू शकता का योग्य उत्तर?)

(हे ही वाचा: Viral: एका छोट्याशा बेडकाकडून महाकाय साप कसा हरला? IAS अधिकाऱ्यांनी शेअर केला संघर्षाचा Video)

यूएस नॅशनल आय इन्स्टिट्यूटच्या मते, ऑप्टिकल इल्युजन ही अशी गोष्ट आहे जी तुमच्या दृष्टीशी खेळते. द्विमितीय प्रतिमा पाहण्यासाठी आपले डोळे आणि मेंदू एकत्र कसे कार्य करतात हे ते आपल्याला शिकवते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Optical illusion hidden in this picture is a little squirrel did you find it ttg

ताज्या बातम्या