viral Video: बॉलिवूडचा लाडका आणि आवडता अभिनेता शाहरुख खान याचे सर्वच चित्रपट सुपरहिट आहेत. पण, अशातच ९० दशकातील ब्लॉकबस्टर ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा तर चाहत्यांच्या अगदी हृदयाजवळचा चित्रपट आहे. तर आज सोशल मीडियावर याचसंबंधित एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका तरुणाने दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटातील एक खास सीन तिकिटावर रेखाटला आहे.

दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटातील सगळ्यात खास सीन म्हणजे जेव्हा अभिनेत्री काजोल तिच्या वडिलांकडे तिच्या प्रियकराबरोबर जाऊ देण्याची विनंती करत असते. तसेच वडील नंतर ‘जा सिमरन जा, जिले अपनी जिंदगी’ असे म्हणतातच अभिनेत्री काजोल धावत्या ट्रेनपाशी जाते आणि शाहरुख खान स्वतःचा हात देऊन तिला ट्रेनमध्ये ओढून घेतो आणि त्याच्या लव्हस्टोरीला न्याय मिळतो. तर याच खास सीनचे या व्हिडीओतील तरुणाने सुंदर चित्र रेखाटले आहे. तरुणाची कलाकारी एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून पाहा.

हेही वाचा…जोडप्याची रिक्षातून भारतभ्रमंती; नऊ महिन्यात नऊ हजार किलोमीटरचा केला ‘असा’ प्रवास; पाहा VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, तरुण तिकिटावर ब्रशच्या सहाय्याने वॉटर कलरने रंग देण्यास सुरुवात करतो. बघता बघता तरुण अभिनेत्री काजोल व अभिनेता शाहरूख खानचे हुबेहूब चित्र रेखाटतो. चित्रपटातील या सीनचे बारकाईने अभ्यास करून ट्रेन, त्या सीनदरम्यानचे अभिनेत्यांचे कपडे आणि काजोल आणि शाहरुख खान एकमेकांचा हात पकडत आहेत हे खास दृश्य, तर ट्रेनवरील मजकूर सुद्धा चित्रात रेखाटलं आहे ; जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @manu.ksd या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. मनू असे या कलाकाराचे नाव आहे. तसेच या व्हिडीओला “ट्रेनच्या तिकिटावर दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे चित्रपटातील या खास सीनचे वॉटर कलरने पेंटिंग केलं, प्रवाशांना प्रवासाच्या शुभेच्छा” ; अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. तसेच नेटकरी हा व्हिडीओ पाहून तरुणाच्या कौशल्याचे आणि त्याच्या या खास कलेचं कौतुक करताना दिसून आले आहेत.