Pakistan Floods: देशव्यापी पुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने, पाकिस्तानच्या लाहोरमध्ये भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. प्राप्त माहितीनुसार, टोमॅटोची किंमत प्रति किलो ५०० रुपये आहे (पाकिस्तानी रुपयात) झाल्याचे समजत आहे. पुरामुळे भाजीपिकांचे नुकसान झालेच पण सोबतच पुरवठा साखळी सुद्धा विस्कळीत झाली होती, परिणामी विक्रीभाव वधारले आहेत, सध्या पाकिस्तानात कांदा ३०० रुपये किलो तर लिंबू ४०० रुपये किलो दराने विकला जात आहे.

वास्तविक हे वाढीव दर हे विक्रेत्यांच्या मनमानीमुळे झाले आहेत अशी माहिती मीडिया रिपोर्ट्समधून समोर येत आहे. मुळात पाकिस्तान सरकारतर्फे टोमॅटोची किंमत ८० रुपये तर कांदा ६१ रुपये किलो होती पण खाजगी विक्रेते सध्या या भाज्या पाच पट भावाने विकत आहेत. सोबतच आले आणि लसूणच्या दरातही वाढ झाली आहे. दरम्यान या दर वाढीविषयी आपली बाजू मांडताना, घाऊक बाजारातून चढ्या दराने भाजीपाला खरेदी करत असल्याने आम्हालाही भाव वाढवले लागल्याचे दुकानदार सांगत आहेत. (Ind vs Pak Photos: ‘लो स्कोअरिंग’ पण हाय व्होल्टेज! भारत-पाक सामन्यामधील काही खास क्षणचित्रे)

पाकिस्तानात अचानक आलेल्या पुरांमुळे देशात प्रचंड नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार देशाला आधीच ५.५ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाल्याचे समजतेय. सिंध आणि पंजाब प्रांतात ऊस आणि कापूस पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत तर कांदा, टोमॅटो आणि खरीप मिरचीचे अंशतः नुकसान झाले आहे. कापूस पिकांचे २.६ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. सिंधमधील सरकारी गोदामांमध्ये साठवलेला किमान २ दशलक्ष टन गहू पाऊस आणि पुरामुळे खराब झाला आहे, ज्यामुळे देशाच्या अन्न सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे,

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्याची परिस्थिती पाहता, पाकिस्तानला केवळ उद्योगांसाठी पुरवठा टंचाईचा सामना करावा लागू शकतो तसेच देशात बियाणे संकट देखील उद्भवू शकते. दुसरीकडे पाकिस्तानची निर्यात क्षमता सुद्धा १ बिलियन डॉलरने कमी होण्याची शक्यता आहे परिणामी देशाला आणखी आर्थिक नुकसान सहन करावे लागेल.