Pakistan Pilot Viral Video : समाजमाध्यमांवर पाकिस्तानमधील एका विमानाच्या पायलटचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बघून लोकांना हसू आवरेनासं झालं आहे. या व्हिडीओत दिसतंय की विमानाचा पायलट कॉकपिटच्या खिडकीतून बाहेर येऊन विमानाची विंडस्क्रीन स्वच्छ करतोय. अनेक जण या विमानाच्या पायलटची थेट ट्रकचालकांशी तुलना करत आहेत. ट्रकचालक जसे त्यांच्या ट्रकची काच पुसतात अगदी तशाच पद्धतीने हा पायलट विमानाची काच पुसताना दिसतोय.

पाकिस्तानमधील असे अनेक व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत असतात. कधी नव्या मॉलच्या उद्घाटनानंतर अख्खा मॉल लुटल्याची घटना घडते, तर कधी लोकांनी ट्रेनचे डबे ढकलल्याचा व्हिडीओ पाहायला मिळतो. सध्या पाकिस्तान इंटरनॅशनल एयरलाइन्सच्या एका पायलटचा व्हिडीओ लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. तसेच हा व्हिडीओ पाकिस्तान एअरलाईन्सची खराब झालेली आर्थिक परिस्थिती जगासमोर मांडतोय.

या व्हिडीओत दिसतंय की ढग दाटून आले आहेत. रिमझिम पाऊस चालू आहे. विमानाच्या काचेवर पाणी पडून दृष्यमानता कमी झाली आहे. त्यामुळे पायलट कॉकपिटच्या सीटजवळ असलेल्या खिडकीतून बाहेर आला आणि कागदाने काच पुसू लागला. हा १९ सेकंदांचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

हे ही वाचा >> VIDEO: “हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला” आजीपुढं नातीसुद्धा फिक्या; नऊवारी साडीत डोक्यावर पदर घेत आजीचा भन्नाट डान्स

पाकिस्तान एअरलाईन्सची आर्थिक स्थिती बिकट

पाकिस्तानमधील एका विमान प्रवाशाने एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी शेअर केला होता. ज्यामध्ये धुळीने माखलेल्या, हँडल तुटलेल्या खुर्च्या दिसत आहेत. या अनुभवाचे वर्णन भीतीदायक आणि सर्वात धोकादायक फ्लाइटपैकी एक असे केले आहे. अनेकांनी या विमानाची थेट बसशी तुलना केली आहे.

हे ही वाचा >> माणुसकीचं अनोखं दर्शन! तरुणाने जे केलंय ते क्वचितच कोणी करेल…VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडिओत दिसतंय की केबिन क्रू प्रवाशांना सांगत आहे की येथे काहीही रेकॉर्ड करण्याची परवानगी नाही. मात्र, त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून प्रवासी सीटवर पोहोचताच कॅमेरा ऑन करतो आणि खुर्च्यांवर साचलेल्या धुळीपासून ते तुटलेल्या हँडलपर्यंत सर्व काही दाखवू लागतो. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून लोक त्यावर भरभरून कमेंट करत आहेत. अली खान नावाच्या एका युजरने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. यावर एका युजरने कमेंट केली आहे की “या विमानात एकट्याने प्रवास करा”, तर दुसऱ्या एका युजरने म्हटलंय, “तुम्ही खरोखरच मृत्यूला सामोरे जात आहात.”