Pakistan Toll Plaza Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो पाहून लोक अक्षरशः हसून लोटपोट झाले आहेत. हा व्हिडीओ पाकिस्तानचा असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यात दिसणारा प्रकार इतका विचित्र आहे की, पाहणाऱ्यानं एकदा नाही, तर दोनदा स्क्रीनकडे पाहिलं! कारण- यात टोल बॅरिअर उघडणं आणि बंद करणं हे काम मशीननं नाही, तर माणसानं… तेही पायांनी केलं जात आहे.
“टेक्नॉलॉजी नाही, पायांची जादू!”
व्हिडीओमध्ये दिसतं की, एका टोल प्लाझावर दोन पुरुष खुर्चीवर निवांत बसलेले आहेत. त्यांच्यासमोर लोखंडी पाइपसारखा बॅरिअर लावलेला आहे. गाडी आली की, एक जण पाय पुढे करून त्या पाइपला दाबतो आणि बॅरिअर वर उचलला जातो. गाडी गेल्यावर तो पाय सोडतो आणि बॅरिअर आपोआप खाली येतो. ना बटण, ना सेन्सर, ना मशिनरी फक्त मानवी टाचांची ताकद. या जुगाडाला पाहून लोकांनी थेट नाव ठेवलं. “मॅन्युअल टोल प्लाझा, पाकिस्तान स्टाईल!”
भन्नाट कमेंट्स
हा व्हिडीओ ‘X’ (माजी ट्विटर)वर @VigilntHindutva या हँडलवरून शेअर करण्यात आला असून, लाखो व्ह्युज मिळाले आहेत. त्यावर लोकांचे भन्नाट रिअॅक्शन येत आहेत.
एका युजरनं लिहिलं, “त्यांचा लेग डे म्हणजे हाच!” दुसऱ्यानं हसत लिहिलं, “हेच तर खऱ्या अर्थानं Human Robotics आहे!” तिसरा म्हणतो, “अजूनही हे लोक ९० च्या दशकात जगत आहेत.” तर एका युजरनं विचारलं, “अहो, पण पैसे घेतात तरी कसे?”
एकानं तर भन्नाट कमेंट केली – “AI कधीच यांची जागा घेऊ शकणार नाही!” आणि दुसरा म्हणाला- “पुढच्या लेव्हलला हे लोक टोल पार करणाऱ्या गाड्या धुण्यासाठी हँड (किंवा फूट) पंप बसवतील.”
या व्हिडीओवर काहींनी तर पाकिस्तानचं कौतुक केलं. अर्थातच टोमण्यानं. एका युजरनं लिहिलं, “पाकिस्ताननं जगातील सर्वांत अॅडव्हान्स्ड AI-बेस्ड टोल प्लाझा तयार केला आहे!”
अखेर लोकांचा निष्कर्ष
हा व्हिडीओ पाहून सगळ्यांनी एकच गोष्ट मान्य केली. “जुगाडाची लेव्हल कुठं पोहोचलीय हे फक्त पाकिस्तानच दाखवू शकतो!” नेटिझन्स म्हणतात, “हा टोल बॅरिअर पाहून माथा पिटावासा वाटतो; पण हसायचंही थांबत नाही.”
हसवणारा आणि डोकं फिरवणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे. पाहणारे म्हणतात, “असं टोल प्लाझा भारतात आलं, तर फिटनेस सेंटरची गरजच नाही!”