Arambh hai prachand: आजकाल लोक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ तयार करतात आणि सोशल मीडियावर पोस्ट करतात. यातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही होतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका मुलाने प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता, गायक आणि गीतकार पियुष मिश्रा यांच्या एका अतिशय प्रसिद्ध गाण्याचे शब्द बदलून गाणं तयार केलं आहे. या व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीने पियुष मिश्राच्या गाण्याचा संपूर्ण अर्थच बदलून टाकला आहे. सोशल मीडियावर लोकांना या गाण्याला खूप पसंती मिळत आहे.

सध्या थंडीचे वातावरण आहे. सगळीकडेच प्रचंड थंडी आहे. सोशल मीडियावर एका व्यक्तीने पियुष मिश्रा यांच्या ‘आरंभ है प्रचंड’ या प्रसिद्ध गाण्याचे शब्द बदलून ते थंडीला समर्पित केले आहे. ही व्यक्ती बाइक चालवताना हे गाणे गाताना दिसत आहे. या व्यक्तीने पीयूष मिश्रा यांच्या ‘आरंभ है प्रचंड’ या गाण्याचे रूपांतर ‘ठंड है प्रचंड’मध्ये केले. या गाण्याचे बोल हिंदीमध्ये असे आहेत की, ठंड का प्रकोप और धूप का है लोप,आप बिस्तरों पर चाय की गुहार दो,ना नहा सको तो आप खोपड़ी भिगो लो,और इस तरह से गैप मार दो,जो नहा चुका है मित्र सिर्फ वही है पवित्र.”

पियुष मिश्रा यांचं हे बदलेलं गाण एकून तुम्हीही पोट धरुन हसाल. आतापर्यंत हे गाणे सोशल मीडियावर साडे सहा लाखांहून अधिक वेळा पाहिले गेले आहे. हा व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: वयाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रेम जपता आलं पाहिजे! आजोबांचं आजीवरचं प्रेम पाहून व्हाल भावूक

लोक मजेशीर कमेंट करत आहेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या गाण्यावर अनेक कमेंट्स केल्या जात आहेत. एका व्यक्तीने ‘तुम्हाला २१ तोफांची सलामी’ अशी कमेंट केली आहे. आणखी एका युजरने कमेंट केली आहे की, ‘भाऊ, आंघोळ करायची गरज नाही, मन स्वच्छ असले पाहिजे.’ तर दुसर्‍या युजरने कमेंट केली आहे की, ‘शहाणपणा म्हणजे जेव्हा तुम्हाला हे समजते की दररोज आंघोळ करणे आवश्यक नाही, तर दररोज आंघोळ केलेले दिसणे महत्त्वाचे आहे.’ ‘हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रेरणा गीत आहे, चुकीचे गाऊन त्याची खिल्ली उडवू नका,’ अशी प्रतिक्रिया आणखी एका युजरने दिली आहे.