Parrot dance Video viral: आजकाल सोशल मीडियावर व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. कोणता व्हिडीओ कधी व्हायरल होईल याचा अंदाज बांधणं फार कठीण आहे. आजकाल सोशल मीडियावर सर्वात जास्त प्राण्यांचे पक्षांचे व्हिडीओ व्हायरल होतात मग ते पाळीव प्राण्यांचे असो वा जंगली प्राण्यांचे. सध्या असाच एक पोपटाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. पोपट हा जगातील एकमेव असा पक्षी आहे; जो मानवी आवाजांचे हुबेहूब अनुकरण करू शकतो. जो माणसासारखे बोलू शकतो. एखाद्या व्यक्तीने तोंडून उच्चारलेले शब्द ऐकून तो ते पुन्हा म्हणू शकतो. जगातील कोणताही प्राणी किंवा पक्षी असे करू शकत नाही. मात्र तुम्ही कधी पोपटाला नाचताना पाहिलंय का? नाही ना मग हा व्हिडीओ पाहा यामध्ये तुम्ही पाहू शकता पोपटानं जबरदस्त असा डान्स केलाय. तु्म्हीही पाहा हा व्हिडीओ..

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पोपट पंजाबी गाण्यावर नाचताना दिसत आहे. सुगंधा शर्माच्या चार्टबस्टर पंजाबी गाण्या ‘मेरी मम्मी नु’ वर एक पोपट नाचताना दिसत आहे. मिट्टूच्या डान्स स्टेप्स पाहून नेटकऱ्यांनाही आनंद झाला आहे. पोपटाच्या मालकाने लॅपटॉपवर हे गाणे वाजवले त्यानंतर पोपट मान वळवून नाचत आहे. पोपट कधी वर्तुळात फिरतो, कधी उडी मारतो आणि कधी पूर्ण शैलीत आपली मान फिरवतो.

पोपट माणसांचे हुबेहूब आवाज काढतो, ही गोष्ट प्रत्येकालाच आश्चर्यचकित करणारी आहे.  पोपटांची जीभ जाड असते; जी त्यांना आवाजाचे अनुकरण करण्यास मदत करते. पोपट विशेषतः मानवी शब्द आणि आवाजांचे अनुकरण करण्यात पटाईत असतात. उदाहरणार्थ- पोपट “हॅलो, कसे आहात?” असे सहज म्हणू शकतो. असे असले तरी पोपटांना माणसाप्रमाणे समज नसते किंवा माणूस काय बोलत आहे हे त्यांना कळत नसते; परंतु तुम्ही ज्या गोष्टी रोज वारंवार बोलता, त्या ऐकलेल्या गोष्टी पुन्हा त्याच पद्धतीने उच्चारण्यात पोपट खूप पटाईत असतात.

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Rocking Vibes (@rockingvibes92)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ rockingvibes92 नावाच्या वापरकर्त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला व्हिडिओ काही वेळातच व्हायरल झाला. हा व्हिडिओ पोस्ट केल्यापासून हजारो लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओचा कमेंट सेक्शन इंटरनेट युजर्सच्या मजेदार कमेंट्सने भरला आहे. युजर्सनी व्हिडिओवर नक्कीच आनंदी प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना, एका युजरने म्हटले, “व्वा, तुझा पोपट नाचतोय आणि माझा चावतोय.” दुसरा वापरकर्ता म्हणाला, “तो त्याची मान खूप चांगली हलवत आहे, तुम्ही त्याला कसे प्रशिक्षण दिले?” तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “तो डान्सर बनणार होता, पण चुकून तो पोपट झाला