Viral video: आजकाल सोशल मीडियावर व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. कोणता व्हिडीओ कधी व्हायरल होईल याचा अंदाज बांधणं फार कठीण आहे. आजकाल सोशल मीडियावर सर्वात जास्त प्राण्यांचे पक्षांचे व्हिडीओ व्हायरल होतात मग ते पाळीव प्राण्यांचे असो वा जंगली प्राण्यांचे. सध्या असाच एक भांडखोर पोपटाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. पोपट हा जगातील एकमेव असा पक्षी आहे; जो मानवी आवाजांचे हुबेहूब अनुकरण करू शकतो. जो माणसासारखे बोलू शकतो. एखाद्या व्यक्तीने तोंडून उच्चारलेले शब्द ऐकून तो ते पुन्हा म्हणू शकतो. जगातील कोणताही प्राणी किंवा पक्षी असे करू शकत नाही. याच पोपटाचं आणि त्याच्या मालकिणीचं मराठीत कडाक्याचं भांडण सध्या व्हायरल होतंय..तु्म्हीही पाहा हा व्हिडीओ

पोपटाचं मालकिणीसोबत मराठीत भांडण

Essay on My Favourite Teacher goes viral
VIRAL: ६ वीतल्या विद्यार्थ्याचा निबंध वाचून शिक्षक कोमात; भूमिका मॅडमसाठी लिहिलेला निबंध होतोय तुफान व्हायरल
cow cuddling Seller Then Vendore feeding the some vegetables To Her Video Winning Hearts Online
VIDEO: गाय पक्की शिस्तीची! भाजीवाल्याकडे खाणं मागायला गेली अन् असं काही केलं की, तुम्हीही कराल कौतुक…
pm narendra modi (2)
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना प्रत्युत्तर, “औरंगजेब हे १०४ थं दुषण…”
Elders Recreate Butterfly Song Dance cute video goes Viral
आयुष्य हे मनसोक्त जगावं! ‘बटरफ्लाय’ गाण्यावर वृद्ध लोकांचा भन्नाट डान्स, डान्स स्टेप्स एकदा पाहाच, VIDEO व्हायरल

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा पोपट त्याच्या मालकीणीशी कसा भांडत आहे. तो अज्जीबात तिचं बोलणं एकून घेत नाही. तर तिलाच उलट बडबड करत तिच्याशी भांडत आहे. एका मालकिणीने आपल्या पाळलेल्या पोपटाला पिजऱ्यात बंद करून ठेवलं आहे. तसेच पोपट सतत त्रास देत असल्याने ती मराठीमध्ये त्याला ओरडत आहे. तू जास्त शहाणा झालास का? असं महिला त्याला ओरडत आहे. त्यावर पोपट तिला म्हणतो की, तू लय बोलतेस का? मिठू मिठू ऐवजी पोपटाने थेट भांडण केल्याने सर्वच अवाक् झाले आहेत. पोपट माणसांचे हुबेहूब आवाज काढतो, ही गोष्ट प्रत्येकालाच आश्चर्यचकित करणारी आहे. 

पोपटांची जीभ जाड असते; जी त्यांना आवाजाचे अनुकरण करण्यास मदत करते. पोपट विशेषतः मानवी शब्द आणि आवाजांचे अनुकरण करण्यात पटाईत असतात. उदाहरणार्थ- पोपट “हॅलो, कसे आहात?” असे सहज म्हणू शकतो. असे असले तरी पोपटांना माणसाप्रमाणे समज नसते किंवा माणूस काय बोलत आहे हे त्यांना कळत नसते; परंतु तुम्ही ज्या गोष्टी रोज वारंवार बोलता, त्या ऐकलेल्या गोष्टी पुन्हा त्याच पद्धतीने उच्चारण्यात पोपट खूप पटाईत असतात.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> आयुष्य घडवणाऱ्या शाळेनं IPS मनोज शर्मांचा केला ‘असा’ सन्मान; PHOTO पोस्ट करीत म्हणाले, “जगात कुठल्याही…”

@nikku__7020 या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून लोक विविध प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिले,”मला त्या पक्षाची नियुक्ती करायची आहे” दुसरा म्हणतो, “निसर्गाची स्वत:ची एक प्रक्रिया असते”.