भारतात रेल्वेचे जाळे सर्वत्र पसरले आहे पण भारताची लोकसंख्या पाहता रेल्वे गाड्यांची संख्या कमीच पडते. प्रवाशांनी खचाखच भरलेल्या रेल्वे गाड्या आपण नेहमीच पाहता. अशा रेल्वे गाड्यांमधून प्रवास करणे म्हणजे सोपी गोष्ट नाही. बऱ्याच रेल्वेचा गाड्यांमध्ये सर्वसाधारण आणि स्लीपर आणि एसी डब्यांमध्येही प्रचंड गर्दी दिसून येते. विशेषत: जनरल आणि स्लीपर कोचमध्ये एवढी गर्दी असते की, लोकांना बाहेर पडणे कठीण होते. गर्दीने खचा खच लोकांना शौचालयापर्यंत (टॉयलेट) पोहोचण्यासाठी किंवा स्टेशनवर उतरण्यासाठीही खूप संघर्ष करावा लागतो.असाच काहीसा प्रकार एका तरुणाबरोबर घडला आहे. प्रवाशांनी भरलेल्या रेल्वेगाडीत शौचालयापर्यंत पोहचण्यासाठी व्यक्तीने हटके जुगाड शोधला आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

प्रवाशांच्या गर्दीने असलेल्या रेल्वेने प्रवास करणे फार अवघड असते. त्यात जर जर जर एखाद्याला लघवीला किंवा शौचाला जायचे असेल तर त्याची परिस्थिती काय होईल याची कल्पना तुम्ही करू शकता. अशी वेळ एका तरुणावर आली पण त्याने हार न मानता शौचलयापर्यंत पोहचण्यासाठी भन्नाट युक्ती शोधली. व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एक तरुण प्रवशांच्या गर्दीने भरलेल्या रेल्वेगाडीमध्ये शौचालयापर्यंत पोहचण्यासाठी चक्क स्पायडर मॅन झाला आहे. हे पाहून इतर प्रवासी आश्चर्यचकित होतात. चित्रपटात दाखवल्याप्रमाणे जसा स्पायडरमॅन छतावर चढतो तसा हा तरुण रेल्वे गाडीत छताचा आधार घेऊन प्रवाशांच्या गर्दीच्या वरून शौचलयाच्या दिशेने जात आहे. तरुणाचा ही युक्ती कोणीतरी कॅमेऱ्यात कैद केली आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. तरुणाचा हा जुगाड पाहून लोकांना हसू आवरता येईना. व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू येईल.

हेही वाचा – बहिणीच्या लग्नाआधीच बंद झालं डिलिव्हरी बॉयचं खातं; ढसा ढसा रडणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ पाहून झोमटोने दिले उत्तर

व्हिडिओ व्हायरल होत आहे

@log.kya.kahenge या इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. तसेच कॅप्शनमध्ये लिहिले आहे – “जनरल आणि स्लीपर क्लासमधील एक सामान्य दिवस.” अनेकांनी या व्हिडिओला लाईक केले असून त्यावर मजेशीर कमेंटही केल्या आहेत. अनेक नेटकऱ्यांचा असा विश्वास आहे की स्लीपर आणि जनरलची स्थिती जवळजवळ सारखीच झाली आहे.

हेही वाचा – बापरे! मोबाईलच्या नादात महिलेने चिमुकल्याला फ्रिजमध्ये ठेवले? व्हायरल व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा

यूपी-बिहार ट्रेन असल्याचा नेटकऱ्यांचा दावा

एका युजरने लिहिले आहे, “ही रेल्वेगाडी यूपी-बिहारच्या दिशेने असेल हे निश्चित आहे.”दुसऱ्या यूजरने लिहिले आहे ,”थर्ड एसी सुद्धा जवळपास असेच आहे.” तिसऱ्याने लिहिले,”स्पायडरमॅन: टॉयलेटपासून दूर”