पावरी हो रही है गर्ल दाननीर मोबीन पुन्हा परतली आहे आणि यावेळी तिने तिच्या फॉलोअर्ससाठी तिचा एक नवीन व्हिडीओ आणला आहे. दनानीरने गुरुवारी, ३ मार्च रोजी इंस्टाग्रामवर ‘पावरी हो हो ही है’ चा नवीन व्हर्जन शेअर केल. यामध्ये तिचे वडील आणि भावंडे एका फोटोमध्ये दिसत आहेत. मुलीसह दिसत आहेत. दाननीरने स्वत: व्हायरल सोशल मीडिया ट्रेंडच्या या गोंडस व्हर्जनसह लिप-सिंक केले.
पाकिस्तानमधील सोशल मीडियावर व्हायरल झालेली दाननीर मुबीनने यांनी गेल्या वर्षी इंस्टाग्रामवर पावरी हो रही है वाला व्हिडीओ शेअर केला होता, जो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. संगीतकार यशराज मुखाटे यांनी तिच्या व्हिडीओंचा मॅशअप तयार केल्यानंतर या ट्रेंडला भारतात लोकप्रियता मिळाली. रणवीर सिंगपासून ते मोठे मोठे कलाकार सर्वजण ट्रेंडमध्ये सामील झाले आहेत. आता व्हायरल होत असलेल्या या नवीन व्हिडीओमध्ये “ही मी आहे आणि हा आमची बाप आहे आणि ही आमच्या वडिलांची पार्टी आहे.” असं ती म्हणते.
(हे ही वाचा: Viral Photo: ओळखा पाहू; हा फोटो भारतातील कोणत्या राज्यातील आहे?)
(हे ही वाचा: Viral Photo: ‘या’ फोटोत लपलेला हिम बिबट्या तुम्ही शोधू शकता का? फोटोग्राफरच होतय कौतुक)
दाननीर इंस्टाग्रामवर लहान मुलीची क्लिप शेअर केली आणि पावरी हॅपनिंगच नवीन व्हर्जन पुन्हा तयार केल. तिने हे दोन्ही व्हिडीओ इन्स्टावर शेअर केले आहेत. असे व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. “Hiiii मित्रांनो. या मुलीने मला मागे टाकले आहे, #pawrihoraihai ची आतापर्यंतच सर्वोत्तम व्हर्जन. मूळ व्हिडीओ पाहण्यासाठी स्वाइप करा.”
(हे ही वाचा: Video: श्रीवल्ली गाण्यावरचा चिमुकल्याचा डान्स viral; नेटीझन्स म्हणतात ‘सगळ्यात गोड पुष्पा हाच’)
नेटीझन्सच्या प्रतिक्रिया
या पोस्टला आतापर्यंत १ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. लोक या व्हिडीओला खूप पसंत करत आहेत आणि खूप कमेंट करत आहेत. दाननीर मुबीनचे इंस्टाग्रामवर १.९ मिलियन फॉलोअर्स आहेत.