सुर्योदय आणि सुर्यास्त पाहताना एक वेगळाच आनंद मिळतो. क्वचितच एखादा व्यक्ती असेल ज्याला सुर्योदय किंवा सुर्यास्त पाहायला आवडतं नसेल. न्यूयॉर्कचे लोकही सनसेट पाहण्यासाठी अक्षरशः वेडे होतात. सनसेटसाठी त्यांचं हे वेड दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. रस्त्यावरील सुंदर सनसेट टिपण्यासाठी न्यू यॉर्कमधील लोकांनी तर थेट ट्रॅफिकच थांबवली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ किरा नावाच्या युजरने ट्विटरवर शेअर केला आहे. तिने कारमधून हा व्हिडीओ रेकॉर्ड केलाय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चित्तथरारक सनसेट कॅप्चर करण्यासाठी लोकांचा मोठा जमाव कसा जमला होता. रस्ता खूपच वर्दळीचा होता. पण लोकांनी त्याची सुद्धा पर्वा केली नाही. इतकंच नव्हे तर एक तरूणी या सनसेटच्या माहौलमध्ये डान्स करताना सुद्धा दिसत आहे.

आणखी वाचा : …अन् खड्ड्यात पडले स्कुटीस्वार पती-पत्नी, हा धक्कादायक VIRAL VIDEO पाहून हादरून जाल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : भारतीय कोब्राने गिळला ५ फूट लांबीचा रसेल वायपर साप, पाहा हा भयानक VIRAL VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. लोक या व्हिडीओचा भरपूर आनंद घेताना दिसत आहेत. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला १०.९ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तसंच ४ लाख ९८ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक सुद्धा केलं आहे. न्यू यॉर्कमधील मधील लोकांचं सनसेटसाठीचं हे वेड पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. लोक या व्हिडीओवर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया शेअर करताना दिसून येत आहेत.