River Flood Dangers Viral Video: निसर्ग हा दाता आहे असे मानतात कारण तो आपल्याला अन्न, हवा, पाणीसह अनेक जीवनपयोगी गोष्टी देतो. पण निसर्गाच्या या उपकाराचा आपल्याला विसर पडल्याने त्याचा आदर करत नाही. निसर्गाची काळजी घेत नाही. आपल्या स्वार्थासाठी झाडे तोडतो, नदी पात्रातील माती उपसून काढतो, डोंगर फोडून खडक वापरतो, प्रदूषण करतो…अशा कित्येक गोष्टींमुळे निसर्गाचा र्‍हास होत आहे पण निसर्गाला हलक्यात घेऊ नका कारण वेळ आली की निसर्गही रौद्र रुप धारण करतो. निसर्गाच्या या रौद्र रुपासमोर कोणीही टिकू शकत नाही. अशाच एका घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये शांत नदीने अचानक रौद्र रुप कसे धारण करते हे दाखवले आहे.

अनेकांना नदीच्या काठावर चालायला आवडते. लोक तिथे बसून थंड हवेचा आनंद घेतात, पाण्याचा प्रवाह पाहतात. पण, शांत दिसणाjरी नदी कधी रौद्ररुप धारण करेल हे कोणीही सांगू शकत नाही. हेच सिद्ध करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून वापरकर्ते थक्क झाले आहेत.

intnewsofficial नावाच्या एका वापरकर्त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये शांत दिसणारी नदी अचानक कशी हिंसक झाली हे दाखवले आहे. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काही लोक शांत नदीच्या काठावर उभे असल्याचे दिसून येते. ते सामान्य दिसतात. त्यानंतर अचानक नदीत एक मोठी लाट किनाऱ्याकडे सरकताना दिसते.

किनाऱ्याकडे येणारी प्रचंड लाट पाहून तिथे उभे असलेले लोक पळू लागतात, तर काही जण हे भयानक दृश्य कॅमेऱ्यात कैद करू लागतात. लाट किनाऱ्याकडे खूप वेगाने जाते आणि खूप वेगाने आदळते. व्हिडिओच्या शेवटी पाण्याचे शिंपडे स्पष्टपणे दिसतात, ज्यामुळे लाट किती वेगवान होती याचा अंदाज लावणे सोपे होते.

इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेले व्हिडिओ लाखो वापरकर्त्यांनी पाहिले आहेत. हा व्हिडिओ दीड लाखाहून अधिक वापरकर्त्यांनी लाईक केला आहे. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये त्यांनी स्पष्टपणे धक्कादायक प्रतिक्रिया दिली. कमेंट सेक्शनमध्ये वापरकर्त्यांनी नदीचे उग्र स्वरूप भयावह असल्याचे वर्णन केले आणि म्हटले की शांत दिसणाऱ्या पाण्याची कधीही खिल्ली उडवू नये. ते कधी स्वत:चे रूप बदलेले हे सांगू शकत नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडिओवर कमेंट करताना एका वापरकर्त्याने लिहिले, “पाणी शांत असेल तर त्याच्या खोलीबाबत मस्करी करू नये.” दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले, “कॅमेरामनला पळून जाण्याची गरज नव्हती कारण कॅमेरामन कधीही मरत नाही.” तिसऱ्या वापरकर्त्याने म्हटले, “प्रकृतीची विनाश लीला सुरू आहे. आताच सावध व्हा नाहीतर मृत्यू अटळ आहे.” त्याच वेळी, दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले, “निसर्गाशी खेळू नका…निसर्ग ती ताकद आहे ज्याला रोखण्याची हिम्मत कोणीही करू शकत नाही.