पाळीव प्राणी; खासकरून पाळीव कुत्रे आपल्या मालकाला न आवडणारी गोष्ट केल्यावर चित्र-विचित्र प्रतिक्रिया देत असतात. काही कुत्रे चूक पकडल्यावर चेहऱ्यावर निरागसतेचा भाव आणून मालकाकडे बघतात; तर काही आपली काही चूक नाहीच, अशा आवेशात मालकांशी भांडतात. पण, या कुत्र्यानं मात्र काहीतरी भलतंच केलंय. मालकानं आपली चोरी पकडली आहे हे लक्षात येताच थोडंही मागे न बघता, त्यानं आपल्या जागेवरून धूम ठोकली.

‘चोरी पकडताच घाबरगुंडी उडाली’ या कॅप्शनसह हा व्हिडीओ ‘reddit’ या सोशल मीडियावर फिरत आहे. या व्हिडीओमध्ये दिसतंय की, तो पाळीव कुत्रा खोलीतल्या एका कोपऱ्यात मालकिणीकडे आणि तिच्या हातात असलेल्या कॅमेऱ्याकडे पाठ करून उभा आहे. तो त्याच्यासाठी असलेल्या खाऊच्या पिशवीत तोंड घालून, आपला खाऊ खात आहे. पण, काही मिनिटांनी जेव्हा कुत्र्याची मालकीण कुत्र्याला हाक मारते, तेव्हा त्याची प्रतिक्रिया बघण्यासारखी आहे.

हेही वाचा : टाकाऊ ते टिकाऊ; यंदाच्या दिवाळीत अशी करा पणत्यांची सजावट…

कुत्र्याला मालकिणीच्या आवाज येताच, आपल्या तोंडातील सगळा खाऊ जमिनीवर टाकून, क्षणभरही न थांबता, तो तिथून धूम ठोकतो. हा व्हिडीओ reddit या सोशल मीडियावर टाकल्यानंतर काही तासांतच लोकांकडून त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. त्याचसोबत अनेक प्रतिक्रियाही मिळाल्या.

रेडिट वापरकर्त्यांनी यावर काय प्रतिक्रिया दिल्या आहेत, ते पाहू.

पहिली व्यक्ती म्हणते, “त्याने ज्या प्रकारे तोंडातून अन्न बाहेर टाकलं; मस्त! खूप गोड.” तर दुसरीनं, “तो वळून परत येईल आणि दुसऱ्या कुत्र्यानं केलंय, असा आव चेहऱ्यावर आणेल.” अशी मस्करी केली. तर तिसऱ्यानं, “माझा पाळीव कुत्रा तर त्या खाऊकडे बघून नुसता जोरजोरात ओरडत बसेल,” असं म्हणतोय.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“माझी काहीच चूक नाही! मी काहीच नाही केलं!” असा विचार कुत्र्याच्या मनात असल्याप्रमाणे एकानं प्रतिक्रिया लिहिली आहे. तर अजून काहींनी, ‘तोंडातून अन्न टाकून दिलं आणि निघून गेला,’ असं लिहिलंय. शेवटी एकानं, “यात त्या कुत्र्याची काहीच चूक नाहीये. तो बिचारा ती पिशवी खराब तर नाही ना, एवढंच बघत होता. तोंडात खाऊ तर अचानक आला,” अशी मिश्कील प्रतिक्रिया लिहिलेली पाहायला मिळाली.