काही महिन्यांपूर्वी त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर भारतीय कर्णधार विराट कोहलीचा एक विचित्र फोटो शेअर केल्यानंतर, डब्लू डब्लू इ (WWE) दिग्गज जॉन सीनाने शनिवारी माजी कर्णधार एमएस धोनीचा असाच एक फोटो शेअर केला आहे. डब्लू डब्लू इ चॅम्पियन कोणतेही ‘स्पष्टीकरण’ न देता त्याच्या सोशल मीडिया हँडलवर विविध सेलिब्रिटींचे फोटो शेअर करण्यासाठी ओळखला जातो.सीनाने आता माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीचा एक मनोरंजक फोटो शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे आणि चाहते त्यावर जोरदार कमेंट करत आहेत.

चाहते देत आहेत प्रतिक्रिया

जॉन सीनाला त्याच्या ‘डॉक्टर ऑफ थुगानोमिक्स’च्या काळात पाहिलेल्या डब्लू डब्लू इ चाहत्यांना त्याचे प्रसिद्ध वाक्य ‘तुम्ही मला पाहू शकत नाही’ ( ‘यू कांट सी मी’ ) हे चांगलेच माहित असेल. त्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एमएस धोनीची रहस्यमय व्यक्तिशी हात मिळवत आहेत असाच एक फोटो शेअर केला आहे.

( हे ही वाचा: T20 WC: पाकिस्तानच्या चाहत्यांकडून धमक्यांच्या बातम्यांवर हसन अलीच्या पत्नीने केली सोशल मीडियावर पोस्ट, म्हणाली…)

तथापि, सीना भारतीय क्रिकेटचा चाहता आहे की नाही हे समजणे अद्याप कठीण आहे कारण तो स्पष्टीकरण किंवा कॅप्शन न देता त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटो पोस्ट करतो. सीनाने पोस्ट केलेल्या फोटोला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला, फोटोने एका तासापेक्षा कमी कालावधीत १ लाखापेक्षा जास्त लाईक्स मिळवले आहेत.

( हे ही वाचा: १३ कोटी भरून मॉडेलने ‘या’ विशेष भागाचा उतरवला विमा! कारण जाणून वाटेल आश्चर्य )

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

( हे ही वाचा: वृद्ध महिलेने रिक्षाचालकाला दिला तीन मजली बंगला आणि करोडोंची संपत्ती; कारण जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य )

जॉन सीनाचा आहे मोठा चाहतावर्ग

डब्लू डब्लू इ मध्ये १६ वेळा चॅम्पियन म्हणून त्याने मागे सोडलेल्या वारशामुळे आणि आता त्याच्या यशस्वी हॉलीवूड कारकीर्दीमुळे, जॉन सीनाचा मोठ्या प्रमाणावर चाहता वर्ग आहे. सीनाला इंस्टाग्रामवर १६ दशलक्ष आणि ट्विटरवर १३ दशलक्षाहून अधिक लोक फॉलो करतात. ४४ वर्षीय व्यक्तीने विविध प्रसंगी आपल्या इंस्टाग्राम हँडलवर भारतीय सेलिब्रिटींचे फोटो शेअर करून भारतीय चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने शेअर केलेल्या इतर सेलिब्रिटी पोस्टमध्ये राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, रणवीर सिंग आणि इतरांचा समावेश आहे.