Viral video: देशात ठिकठिकाणी कोट्यवधी रुपये खर्च करून पूल, टोलेजंग इमारती तसेच मोठमोठे रस्ते बांधण्यात येतात. पण याच बांधलेल्या वास्तू अवघ्या काही दिवसांतच खराब होऊ लागतात, याचे कारण म्हणजे निकृष्ट दर्जाचे काम, यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका असण्याचाही संभव असतो. अशाच एका घटनेचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. एका ठिकाणी पूल कोसळत असलेला व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून अगदी सगळेच हैराण होतील.

८ सेकंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून इमारत पडल्यावर सगळीकडे मोठ्या प्रमाणात धूळ दिसते आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, उंच पूल दिसत आहे मात्र अचानक पूलाचा एक खांब कोसळतो आणि नंतर हळूहळून सर्व भलामोठा ब्रिजच कोसळतो. हे दृश्य खूपच थरारक असून पाहून अंगावर काटा येईल. एका पाठोपाठ खांब कोसळत पूर्ण पूलचाच जमिनीधोस्त होतो. यामध्ये काही जिवितहानी झाली नसली तरी पूल पडल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली.

व्हिडीओमध्ये या पुलाचे सुपर स्ट्रक्चर कोसळताना स्पष्ट दिसत आहे. पुलाच्या पाच पिलरवरील स्ट्रक्चर कोसळले. पुलाची अशी वाताहत झाल्याने त्याच्या बांधकामाचा दर्जा विषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कोणत्या ठिकाणचा आहे हे अद्याप स्पष्ट झालं नाही

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> ‘शिकार करो या शिकार बनो’ जंगली डुक्कर बिबट्याला भिडला; घाबरुन ठोकली धूम, घटना CCTV मध्ये कैद

पूल कोसळल्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडीयावर प्रचंड व्हायरल होतोय. पुलाच्या बांधकामात किती निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले होते, याचा अंदाज आपण हा व्हिडीओ पाहून लावू शकतो. हा पूल क्षणार्धात कोसळला. या व्हिडीओवर यूजर्स मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही व्हिडीओ अतिशय़ मजेदार असतात. तर काही व्हिडीओंना पाहून आपला मूड अगदी फ्रेश होतो. तर काही व्हिडीओ असे असतात जे पाहून खरचं अंगावर काटा येतो. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ क्षणा क्षणाला व्हायरल होत असतात. त्यातील काहीच व्हिडीओ हे ट्रेंड होतात.