Free Pizza Every Month: लग्नात सप्तपदीसह सात वचने देण्याची पद्धत आहे. काळानुसार या वचनांचे स्वरूप बदलले. मी तुझं रक्षण करेन, मी तुला साथ देईन या आणाभाकांच्या पलीकडे जाऊन आता जोडपी लग्नाच्या वचनांना मॉडर्न टच देत आहेत. असंच एक जोडपं सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. आसामची शांती प्रसाद व मिंटू राय ही जोडी २१ जून २०२२ ला लग्नबंधनात अडकली. या लग्नात नुसतं शाब्दिक नव्हे तर एक करारावर स्वाक्षरी करून त्यांनी एकमेकांना वचनं दिली होती. या यादीमध्ये दररोज जिममध्ये जाणं, दर १५ दिवसांनी शॉपिंग आणि दर महिन्याला पिझ्झा या वचनांचा समावेश होता. यातील पिझ्झाच्या अटीचं पालन करण्यासाठी त्यांना पिझ्झा हट कडून एक खास गिफ्ट मिळाले आहे.

पिझ्झा हट (Pizza Hut) ने करवा चौथच्या दिवशी इन्स्टाग्राम अकाउंटवर या व्हायरल जोडप्यासह एक व्हिडीओ पोस्ट केला. शांती प्रसाद व मिंटू राय यांना पुढील एक वर्षासाठी पिझ्झा हट कडून प्रत्येक महिन्याला एक पिझ्झा फ्री मिळणार आहे. दीर्घ व आनंदी सहजीवनासाठी दर महिन्याला पिझ्झा! सर्वांनी अशीच डील करायला हवी असे कॅप्शन देत हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

एक वर्ष फ्री पिझ्झा

Video: बोअरवेल मधून येऊ लागली दारू! बातमी समजताच पोलिसांनी मारला छापा पण घडलं भलतंच..

पिझ्झा हटने शेअर केलेल्या व्हिडिओला जवळपास ३०, ००० व्ह्युज आणि १, ३०० पेक्षा जास्त लाईक्स आहेत. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करून ‘फ्री पिझ्झा मिळवण्याची निन्जा टेक्निक आहे का असं विचारलं आहे. लग्नात काहीतरी हटके करण्याच्या इच्छेतून केलेल्या या करारामुळे पुढील वर्षभरासाठी शांती प्रसाद व मिंटू राय यांना फ्री पिझ्झाचं गिफ्ट मिळालं आहे.