२१ मार्चला सोमवारी, संपूर्ण देश उत्तराखंडमधील एका १९ वर्षीय मुलाच्या एका प्रेरणादायी व्हिडीओने जागा झाला. हा व्हिडीओ जो सोशल मीडियावर वणव्यासारखा पसरत होता, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. कालपर्यंत, उत्तराखंडमधील अल्मोडा येथील प्रदीप मेहरा या मुलाला कोणीही ओळखत नव्हते, परंतु आता तो रातोरात इंटरनेट सेन्सेशन बनला आहे आणि त्याच्या निर्भेळ धैर्याने आणि दृढनिश्चयाने लाखो मने जिंकत आहे.

आता, लेफ्टनंट जनरल सतीश दुआ (निवृत्त) यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे आणि त्याला मदत करण्याची ऑफर दिली आहे. पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते विनोद कापरी यांनी या तरुण मुलासोबतच्या संभाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. मेहरा नोएडाच्या सेक्टर १६ मधील त्यांच्या कामापासून ते बरोला येथील त्यांच्या घरापर्यंत दररोज १० किमीचा प्रवास करतात. त्यांच्या संभाषणादरम्यान, मुलाने सांगितले की तो मॅकडोनाल्ड सेक्टर १६ येथे शिफ्ट झाल्यानंतर कामावरून घरी धावत जातो. तो रस्त्याने का धावतोय याचे कारण विचारल्यावर प्रदीप म्हणाला, “सैन्यात भरती होण्यासाठी.”

canada student visa (1)
कॅनडाच्या ‘त्या’ निर्णयाने भारतीय विद्यार्थी अडचणीत, स्टडी व्हिसाऐवजी व्हिजिटर व्हिसावर कॅनडाला जाण्याच्या प्रयत्नात; कारण काय?
case filed in Actor Aamir Khan deep fake tape case
अभिनेता आमिर खान डीपफेक चित्रफीतीप्रकरणी गुन्हा दाखल
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”

(हे ही वाचा: रात्रीच्या बारा वाजता पाठीवर बॅग घेऊन रस्त्यावरून धावतोय, लिफ्टची ऑफरही नाकारतोय? कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल!)

व्हिडीओने लेफ्टनंट जनरल सतीश दुआ यांचे लक्ष वेधून घेतले आणि त्यांनी त्याला मदत करण्याची ऑफर दिली. “त्याचा जोश प्रशंसनीय आहे आणि त्याला त्याच्या गुणवत्तेनुसार भरती परीक्षा उत्तीर्ण करण्यात मदत करण्यासाठी, मी कुमाऊं रेजिमेंटचे कर्नल, लेफ्टनंट जनरल राणा कलिता, पूर्व आर्मी कमांडर यांच्याशी संवाद साधला आहे. आपल्या रेजिमेंटमध्ये भरती होण्यासाठी मुलाला प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. जय हिंद ” असे निवृत्त जनरल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

(हे ही वाचा: ‘या’ आंब्याला मिळालीये चक्क ‘Z+ सुरक्षा’; हा व्हायरल Photo एकदा बघाच)

(हे ही वाचा: ‘पुष्पा’मधील ‘सामी सामी’ गाण्यावर चक्क हत्तीने धरला ठेका!; Video Viral)

ट्विटरवर या व्हिडीओला ६ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. प्रदीपची कथा सगळ्यांपुढे आणल्याबद्दल चित्रपट निर्मात्याचेही कौतुक केले जात आहे. युजर्सनी प्रदीपच्या यशासाठी प्रार्थनाही केली.