Dagdusheth Halwai Ganpati 2025: लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्राणप्रतिष्ठापना गणेश चतुर्थीला मोठ्या उत्साहात झाली. सकाळपासूनच मंडळाच्या परिसरात भक्तांची मोठी गर्दी उसळली होती. पारंपरिक ढोल-ताशांचा गजर, मंत्रोच्चार आणि भक्तिमय वातावरणात प्राणप्रतिष्ठेची विधिवत पूजा करण्यात आली. मुंबई, पुण्यासह राज्यभरात गणेशोत्सवाची धूम आणि एकच जल्लोष पाहायला मिळत आहे. पुण्यात मानाच्या गणपतीबरोबरच पुणेकरांचा लाडका बाप्पा म्हणजेच श्रीमंत दगडूशेठ गणपती. पुण्यातील प्रसिद्ध आणि मानांच्या गणेशोत्सव मंडळांपैकी एक असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव. मंडळाच्या गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची दरवर्षी गणेशोत्सवामध्ये भाविकांची मोठी गर्दी असते. या गणेशोत्सव मंडळाचे यंदा १३३ वे वर्षे आहे.

पुण्यातील दगडूशेठ गणपती बाप्पाच्या दर्शनाला नेहमीच भाविकांची गर्दी असते आणि त्यात गणेशोत्सवात तर येथे दर्शनाला तुफान गर्दी असते. बाप्पाचं साजरं रूप पाहण्यासाठी भाविक गर्दी करताना दिसतात. यावेळी भाविक तासन् तास रांगेत उभे राहून बाप्पाच्या दर्शनाची आतुरतेनं वाट पाहत असतात. याच दगडशेठ गणपती बाप्पााच्या दर्शनासाठी आलेल्या अलोट गर्दीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचीही झोप उडेल तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पााच्या दर्शनाला जाताना तुम्हीही विचार कराल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ही गर्दी लालबाग परळची नाहीये तर ही गर्दी आहे पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराबाहेरची. एवढंच नाहीतर ही वेळ आहे रात्रीची १ वाजताची. बाप्पाच्या दर्शनासाठी सगळे पुणेकर एकाच दिवशी आलेत की काय असं हा व्हिडीओ पाहून वाटतंय. कारण जिथपर्यंत नजर जातेय तिथपर्यंत पुणेकरांनी बाप्पाच्या दर्शनासाठी रांग लावली आहे. भक्तांची ही गर्दी अक्षरश: वरुन बघताना मुंग्यांप्रमाणे दिसत आहे. मात्र यामध्ये एक विशेष आहे ते म्हणजे एवढी गर्दी असूनही कुठेही धक्का-बुक्की दिसत नाहीये. तसेच रांगही लवकर पुढे जात आहे. मात्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ‘व्हायरल’ होणारे उत्सवी वातावरण, सोशल मीडियावर टाकले जाणारे फोटो, रील्स यांना ‘लाइक्स’ मिळविण्याची हौस अधिक घातक ठरत असल्याची बाब या घटनेमुळे समोर आली आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ shreemant_morya_ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.यावर लोकंही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.